Rohit Sharma 
क्रीडा

IND vs SA: रोहित ठरतोय रबाडाचा 'बनी'! तब्बल 'इतक्यांदा' केलंय आऊट

Rohit Sharma: रोहित शर्माला रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा बाद केलंय.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs South Africa, Rohit Sharma vs Kagiso Rabada:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (5 नोव्हेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सामना होत आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने आक्रमक खेळी केली. पण त्याला कागिसो रबाडाने बाद केले. त्यामुळे रबाडाच्या नावावर एक विक्रम झाला आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताकडून रोहित आणि शुभमन गिल यांनी सलामीला फलंदाजीला येत डावाची सुरुवात केली. एक बाजू गिलने सांभाळलेली असताना दुसऱ्या बाजूने रोहितने हल्ला चढवला होता. त्यामुळे त्यांनी 6 षटकातच भारताला 60 धावांचा टप्पा पार करून दिला होता.

मात्र, आक्रमक खेळणाऱ्या रोहितला 6 व्या षटकात कागिसो रबाडाने चकवले. त्याने रोहितला चूक करण्यास भाग पाडले आणि रोहित तेंबा बावुमाच्या हातात झेल देत बाद झाला. रोहितने 24 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावांची खेळी केली.

दरम्यान, रबाडाने रोहितला बाद करण्याची ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 12 वी वेळ होती. त्यामुळे रोहित रबाडाचा बनी ठरत असल्याचे दिसत आहे. एखाद्या गोलंदाजाचा बनी ठरणे म्हणजेच त्या गोलंदाजाविरुद्ध सर्वाधिकवेळा बाद होणं.

रबाडा रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने टीम साऊदीला मागे टाकले आहे. साऊदीने 11 वेळा रोहितला बाद केले आहे. त्यापाठोपाठ अँजेलो मॅथ्युज आहे. त्याने 10 वेळा रोहितला बाद केले आहे.

  • रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा बाद करणारे गोलंदाज

    • 12 वेळा - कागिसो रबाडा

    • 11 वेळा - टीम साऊदी

    • 10 वेळा - अँजेलो मॅथ्यूज

    • 9 वेळा - नॅथन लायन

    • 8 वेळा - ट्रेंट बोल्ट

अव्वल स्थानासाठी स्पर्धा

दरम्यान, रविवारी होत असलेल्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर येण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. या दोन्ही संघांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.

असे आहेत दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • दक्षिण आफ्रिका - क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), तेंबा बावुमा(कर्णधार), रस्सी वॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सिन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT