Cameron Green | Australia Team X/cricketcomau
क्रीडा

AUS vs WI: अयं...लांब...लांब! विकेट सेलिब्रेट करताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे कोविड पॉझिटिव्ह ग्रीनबरोबर सोशल डिस्टसिंग

Cameron Green Video: वेस्ट इंडिजविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोविड पॉझिटिव्ह असतानाही कॅमेरॉन ग्रीनला खबरदारी घेऊन प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले आहे.

Pranali Kodre

Josh Hazlewood shoos away Covid-positive Cameron Green:

गुरुवारपासून (25 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना ब्रिस्बेनला सुरू झाला आहे. या सामन्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या एका अनोख्या निर्णयाने सर्वांनाच चकीत केले.

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोविड पॉझिटिव्ह असतानाही कॅमेरॉन ग्रीनचा समावेश करण्यात आला आहे.

ग्रीनला आवश्यक ती खबरदारी घेऊन खेळण्याची परवानगी मिळाली आहे. खंरतर बुधवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली होती की कॅमेरॉन ग्रीन आणि प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनल्ड यांचे मेडिकल रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे त्यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमानुसार उर्वरित संघापासून रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत वेगळे करण्यात आले आहे. पण असे असले तरी आवश्यक खबरदारी घेऊन आणि नियम पाळून त्यांना कसोटी सामन्यात सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याचमुळे अष्टपैलू ग्रीन या सामन्यात सहभागी झाला आहे.

सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतावेळीही ग्रीन संघापासून काही अंतरावर थांबला होता. तसेच या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या विकेट गेल्यानंतरही ग्रीनला संघाच्या सेलिब्रेशनमध्ये समील होता येत नव्हते.

यावेळी एक गमतीशीर घटनाही घडली. जेव्हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटला बाद केले, तेव्हा ग्रीन संघाजवळ येत होता. त्याचवेळी हेजलवूडने लांब हो, लांब हो अशा प्रकारचे गमतीने हातवारे करत त्याला इशारा केला.

त्यानंतर ग्रीननेही हसल लांब थांबून सेलिब्रेशनचा आनंद घेतला. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोविड पॉझिटिव्ह असलेल्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी राष्ट्रकूल स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या क्रिकेटमधील अंतिम सामन्यात भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची खेळाडू ताहलिया मॅकग्राथ कोविड पॉझिटिव्ह असतानाही खेळली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक जिंकले होते.

दरम्यान, ब्रिस्बेनला चालू असेलल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत वेस्ट इंडिजने 64 धावांत 5 विकेट्स गमावल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT