AUS vs WI
AUS vs WIDainik Gomantak

AUS vs WI: हेझलवूड ठरला कांगारुंच्या विजयाचा शिल्पकार; अडीच दिवसांत वेस्ट इंडिजचा उडवला धुव्वा!

AUS vs WI 1st Test: ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिजचा 10 गडी राखून पराभव केला आहे.
Published on

AUS vs WI 1st Test: ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिजचा 10 गडी राखून पराभव केला आहे. यासह कांगारु संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ॲडलेड कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ 26 धावांचे लक्ष्य होते, ते त्यांनी सहज गाठले. ऑस्ट्रेलियाने अवघ्या अडीच दिवसांत वेस्ट इंडिजचा पराभव केला. ॲडलेड कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले, जिथे कांगारु वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या.

हेझलवूडचं वादळ

दरम्यान, ॲडलेडमधील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून देण्यात दोन खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने निर्णायक क्षणी शतक झळकावून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. ट्रॅव्हिस हेडने 134 चेंडूत 119 धावांची खेळी खेळली. ट्रॅव्हिस हेडच्या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. याशिवाय, जोश हेजलवूडने सामन्यात सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 25 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवला जाणार आहे.

AUS vs WI
AUS vs WI: करत होता सिक्युरिटी गार्डची नोकरी, आता पदार्पणातच शमर जोसेफने रचला इतिहास

ऑस्ट्रेलियाने अवघ्या अडीच दिवसांत वेस्ट इंडिजचा पराभव केला

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 188 धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्सने 4-4 विकेट घेतल्या. याशिवाय, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने 1-1 विकेट घेतली. वेस्ट इंडिजसाठी किर्क मॅकेन्झीने पहिल्या डावात सर्वाधिक 50 धावा केल्या, तर शमर जोसेफने 36 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियन संघही पहिल्या डावात 283 धावांत सर्वबाद झाला.

AUS vs WI
WI vs ENG T20I: IPL लिलावात अनसोल्ड राहिलेल्या सॉल्टचं सलग दुसरं शतक! इंग्लंडचा विंडीजला धोबीपछाड

ऑस्ट्रेलियाने कसोटी सामना सहज जिंकला

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 95 धावांची मोठी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडने 134 चेंडूत 119 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडच्या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. वेस्ट इंडिजकडून शामर जोसेफने पहिल्या डावात सर्वाधिक 5 बळी घेतले. यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला 120 धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात जोश हेझलवूडने सर्वाधिक 5 बळी घेतले. मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने 2-2 विकेट घेतल्या. कॅमेरुन ग्रीनला 1 विकेट मिळाला. ॲडलेड कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी फक्त 26 धावांचे लक्ष्य होते, ते त्यांनी एकही विकेट न गमावता पूर्ण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com