Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: हा भारतीय खेळाडू जिंकणार 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट', जोस बटलरचं भाकित

T20 World Cup 2022: कर्णधार जोस बटलरने 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' साठी एका स्टार भारतीय खेळाडूचे नाव जाहीर केले आहे.

दैनिक गोमन्तक

Jos Buttler On Player Of The Tournament: T20 विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात आला आहे. आता इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' साठी एका स्टार भारतीय खेळाडूचे नाव जाहीर केले आहे.

या खेळाडूला सांगितले 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) T20 विश्वचषकाचा 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' असे संबोधले आहे. सूर्यकुमार यादव उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. सूर्याने स्पर्धेत 189.68 च्या स्ट्राइक रेटने 239 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.

आयसीसीने या 9 खेळाडूंची निवड केली

आयसीसीने (ICC) 9 खेळाडूंची निवड केली आहे. त्यापैकी इंग्लंडचे तीन, भारत आणि पाकिस्तानचे प्रत्येकी दोन आणि श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे (Zimbabwe) प्रत्येकी एक खेळाडू आहे. पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी जोस बटलर म्हणाला की, 'मला वाटते की, सूर्यकुमार यादवने शानदार प्रदर्शन केले आहे. अनेक स्टार्सनी भरलेल्या संघात ही त्याच्यासाठी चांगली कामगिरी होती.'

विराट कोहलीच्या नावाचाही समावेश

या यादीत विराट कोहलीचेही नाव आहे, ज्याने सहा सामन्यांत 136.40 च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 296 धावा केल्या आहेत. बटलरने त्याचे सहकारी सॅम करन आणि अ‍ॅलेक्स हेल्स यांनाही पुरस्काराचे प्रबळ दावेदार म्हणून नाव दिले. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 82 धावांची इनिंग खेळली होती.

बाबर आझमने हे वक्तव्य केले

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, 'मला वाटतं शादाब खानला पुरस्कार मिळायला हवा. त्याची गोलंदाजी उत्कृष्ट झाली असून फलंदाजीतही सुधारणा झाली आहे. तीन सामन्यांत त्याने चमकदार कामगिरी केली आणि त्याचे क्षेत्ररक्षणही अप्रतिम होते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT