Jonty Rhodes yesterday tried to touch Sachin Tendulkar's feet after the match.  Twitter
क्रीडा

VIDEO: फिल्डिंगमधील बाप माणसाने घेतला क्रिकेटच्या देवाचा आशिर्वाद

पंजाब किंग्सचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्स सचिनपुढे येताच त्याला नमस्कार करायला खाली वाकला.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL) च्या 23 व्या सामन्यात पंजाब किंग्जने सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा 12 धावांच्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर पंजाब किंग्सचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्स (Jonty Rhodes) सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) पाया पडत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या हृदयाला भिडला. प्रत्यक्षात सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा देत होते. त्या दरम्यान हा प्रसंग घडला.

पंजाब किंग्सचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्स सचिनपुढे येताच त्याला नमस्कार करायला खाली वाकला. त्याने अचानक भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू सचिनच्या पायाला स्पर्श करायला सुरुवात केली. सचिनने त्याला तसे करण्यापासून थांबवले आणि आणि नंतर त्याला आनंदाने मिठी मारली. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकली आहेत. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा 2013 साली निवृत्त झाला. पण त्याची क्रेझ त्याच्या चाहत्यांमध्ये अद्याप कायम आहे. क्रिकेटमधील अनन्यसाधारण योगदानामुळे सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं.

आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्या सामन्यानंतर सचिनबदद्ल खेळाडूंमध्ये असलेल्या प्रेमाची आदराची पुन्हा प्रचिती झाली. क्षेत्ररक्षणातील बाप माणूस म्हणून ओळखला जाणाऱ्या पंजाब किंग्स जॉन्टी ऱ्होड्सने सचिन तेंडुलकरचे आशिर्वाद घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने निर्धारित षटकात 5 गडी गमावून 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला 20 षटकांत 9 गडी बाद 186 धावाच करता आल्या आणि सामना 12 धावांनी मुंबईच्या हातून निसटला.

मयंकने 32 चेंडूत 52 धावा केल्या, तर धवनने 50 चेंडूत 70 धावा केल्या. त्याचवेळी मुंबईकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक 49 धावा केल्या. ब्रेव्हिसने 25 चेंडूत 49 धावा केल्या. ओडिन स्मिथने 30 धावांत 4 बळी घेतले. अशा प्रकारे मुंबईचा हा पाचवा पराभव ठरला. रोहित शर्माच्या संघाला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. यासह तो गुणतालिकेत शेवटच्या 10व्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT