IPL 2022: 'दिल मांगे मोर', शुबमन गिल पुन्हा दाखवणार जलवा

आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात मुकाबला होणार आहे.
Shubhaman Gill
Shubhaman GillDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल 2022 मध्ये आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुकाबला होणार आहे. राजस्थान रॉयल्स आतापर्यंत चारपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर दुसरीकडे, गुजरात टायटन्सनेही चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे, परंतु नेट रनरेटमुळे ते सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) आता असा प्रयत्न असणार आहे की, नेट रन रेट सुधारुन पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवावे. आजच्या सामन्यात अनेक सुपरस्टार मैदानात आपला जलवा दाखवणार आहेत. परंतु ज्या खेळाडूवर सर्वांच्या नजरा असतील तो म्हणजे ''शुभमन गिल''. (Shubhaman Gill) (IPL 2022 Shubhaman Gill to play brilliantly again in Rajasthan Royals match against Gujarat Titans)

दरम्यान, शुभमन गिल यंदाच्या मोसमात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या फलंदाजीची खास शैली जी अनेकांच्या लक्षात आली आहे. गिलला त्याचा नैसर्गिक खेळ खेळायला आवडतो. अति-आक्रमकता आणि अति-संरक्षणात्मकता दोन्ही गिल टाळतो. त्याला मारायच्या चेंडूवर तो 'जास्तीत जास्त' प्रयत्न करतो, परंतु या मोसमात त्याची बॅकफूटवरची फलंदाजी पाहण्यासारखी आहे.

Shubhaman Gill
IPL 2022: मुंबई इंडियन्सला मिळणार नवा कर्णधार?

शुभमन गिल बॅकफूटवर अप्रतिम फलंदाजी करतो

शुभमन गिलने यंदाच्या मोसमात बॅकफूटवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. तो बॅकफूटवर कमालीची फलंदाजी करत आहे. या मोसमातील आत्तापर्यंतचे त्याचे सर्व सामने पाहिल्यास, तो बॅकफूटवर सर्वात मजबूत फलंदाज म्हणून दिसला हेही तुम्ही मान्य कराल. सामान्यत: आक्रमक बॅट्समन 'बॅकफूट' वर खूप आत्मविश्वासाने फलंदाजी करतात. ज्याप्रमाणे लहान उंचीच्या फलंदाजांच्या 'फूटवर्क' चे खूप कौतुक केले जाते. त्यांनाही 'स्विंग' चा सामना करणे सोपे जाते, असेही बोलले जाते. त्याचप्रमाणे, उंच फलंदाज बॅकफूटवर बरेच परिपक्व आहेत. ऑस्ट्रेलियाचा (Australia) मार्क वॉ आणि भारताचा मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांची फलंदाजी तुम्हाला आठवत असेल. बॅकफूटवरच्या या फलंदाजांचे आक्रमक फटके तुम्हाला लगेच आठवतील. शुभमनच्या फलंदाजीतून या आठवणी ताज्या होत आहेत.

Shubhaman Gill
IPL 2022: रवींद्र जडेजा पुन्हा बनला RCB चा 'काळ', 3 विकेट्स घेत बनवला नवा रेकॉर्ड

खराब सुरुवातीनंतर शुभमनने दोन अर्धशतके झळकावली

या मोसमात शुभमनची सुरुवात म्हणावी तशी झाली नाही. लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खाते न उघडताच बाद झाला. परंतु पुढच्याच सामन्यात त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 84 धावांची शानदार खेळी उभारली. 46 चेंडूत खेळलेल्या या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. पुढच्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध शुभमन गिलच्या बॅटने खऱ्या अर्थाने जलवा दाखवून दिला. त्याने 59 चेंडूत 96 धावा केल्या. त्यात 11 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. 162.71 चा स्ट्राइक रेट. केवळ 1 षटकार आणि 160 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटसह 96 धावांच्या डावात त्याने किती सावधपणे फलंदाजी केली हे दिसून येते. ग्राउंडेड शॉट्स खेळले. बॅकफूटला आपले शस्त्र बनवले. 19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शुभमन गिल बाद झाला नाहीतर त्याने आपल्या 6 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com