Joe Root  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: जो रुटचा भारताविरुद्ध मोठा रेकॉर्ड; जगातील दिग्गज फलंदाजांना टाकले मागे

India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.

Manish Jadhav

India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करत 246 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने एकूण 436 धावा केल्या. भारतासाठी फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर इंग्लंडच्या एका स्टार फलंदाजाने भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम केला आहे. चला तर मग त्याच्याबद्दल जाणून घेऊया...

जो रुटचा चमत्कार

दरम्यान, जो रुट हा भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने जगातील सर्व फलंदाजांना मागे टाकले आहे. जो रुटने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 29 धावा आणि दुसऱ्या डावात 2 धावा केल्या. यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. रुटने भारताविरुद्ध 2557 धावा केल्या आहेत. पाँटिंग 2555 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ॲलिस्टर कूक 2431 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारे खेळाडू:

जो रुट- 2557 धावा

रिकी पाँटिंग- 2555 धावा

ॲलिस्टर कुक- 2431 धावा

क्लाइव्ह लॉयड- 2344 धावा

जावेद मियांदाद- 2228 धावा

भारताविरुद्ध शतके झळकावली

जो रुटने भारताविरुद्धच्या 26 कसोटी सामन्यांमध्ये 2557 धावा केल्या आहेत, ज्यात 9 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 218 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. भारताविरुद्धच्या कसोटीत तो फक्त एकदाच शून्यावर बाद झाला आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये रुटची गणना होते. त्याने इंग्लंड संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT