Joe Root Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023: भन्नाटच! जो रुट- बेन स्टोक्सने हवेत सूर मारत पकडले अफलातून कॅच, Video एकदा पाहाच

Video: ऍशेस 2023 मधील 5 व्या कसोटीत जो रुट आणि बेन स्टोक्सने घेतलेल्या कॅचने अनेकांना आश्चर्यचकीत केले.

Pranali Kodre

Joe Root and Ben Stokes stunning Catches During 5th Ashes 2023 Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात ऍशेस 2023 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना द ओव्हलवर मैदानावर सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 12 धावांची आघाडी घेतली आहे. पण असे असले तरी इंग्लंडच्या जो रुट आणि बेन स्टोक्स यांनी घेतलेल्या झेलांनी सर्वांचीच वाहवा मिळवली.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 43 व्या षटकात मार्क वूडच्या गोलंदाजीवर मार्नस लॅब्युशेनचा जो रुटने स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना शानदार कॅच घेतला.

जेव्हा चेंडू लॅब्युशेनच्या बॅट लागून मागे आला होता, तेव्हा तो यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो आणि जो रुटच्या मधून चालला होता, पण रूटने त्याच्या उजव्या बाजूला डाईव्ह मारत चेंडू पकडला. त्यामुळे लॅब्युशेनला 9 धावांवर विकेट गमवावी लागली.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाची शेवटची जोडी पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड फलंदाजी करत होती. त्यावेळी जो रुट 104 वे षटक टाकण्यासाठी आला. त्याने अराउंड द विकेटवरून टाकलेल्या चेंडूवर कमिन्सने मिड-विकेटवरून शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने जोरदार शॉट मारला होता.

तेव्हा असे वाटले होते की चेंडू सीमापार जाईल मात्र त्यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्टोक्सने हवेत उडी मारून चेंडू झेलला. पण नियंत्रण सुटून तो सीमारेषेबाहेर जाईल म्हणून त्याने तो चेंडू हवेत फेकला आणि सीमारेषेबाहेर जाऊन परत मैदानात येत तो चेंडू पकडला. त्यामुळे कमिंन्स 36 धावांवर बाद झाला. याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा पहिला डावही 103.1 षटकात 295 धावांवर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. तसेच ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 47 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून या डावात ख्रिस वोक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी इंग्लंडने पहिल्या डावात 54.4 षटकरात सर्वबाद 283 धावा केल्या होत्या. इंग्लंजकडून हॅरी ब्रुकने सर्वाधिक 85 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT