Jhulan Goswami
Jhulan Goswami Dainik Gomantak
क्रीडा

Jhulan Goswami Retirement : झुलन गोस्वामीच्या कारकीर्दीचा शेवट गोड

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय महिला क्रिकेट (Indian Women Cricket) संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडला 3-0 असा व्हाईटवॉश दिला. अखेरच्या सामन्यात इंग्लंडला 16 धावांनी पराभूत करत भारताने संघातील सहकारी झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हीच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट गोड केला.

नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने (England Womens Cricket Team) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलदांजीसमोर भारतीय संघाला 45.4 षटकांत केवळ 169 धावांच करता आल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 43.3 षटकांत 153 धावांत आटोपला. भारताकडून रेणुका सिंगने २९ धावांत ४ तर झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. फलंदाजीसाठी झुलन (Jhulan Goswami) मैदानात येताच इंग्लंडच्या संघानेही तिला गार्ड ऑफ ऑनर दिला.

झुलनने (Jhulan Goswami) इंग्लंडमधून 2002 साली क्रिकेट कारकीर्दीची सुरवात केली होती आणि कारकीर्दीतला अखेरचा सामनाही ती इंग्लंडमध्येच खेळली. त्यापुर्वी 1997 मध्ये महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड या अंतिम सामन्यात ईडन गार्डन मैदानावर झुलनने बॉलगर्ल म्हणून काम केले होते. पश्चिम बंगालमधील चकदा या छोट्याशा गावातून सुरू झालेल्या तिच्या मैदानावरील क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास क्रिकेट पंढरी मानल्या जात असलेल्या इंग्लंडमधील लॉर्डस् मैदानावर येऊन थांबला.

झुलनच्या जीवनावर चित्रपट

दरम्यान, महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार राहिलेल्या झुलन गोस्वामी हिच्यावर 'चकदा एक्सप्रेस' (Chakda Xpress) हा बायोपिक येत असून अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यात झुलनची भूमिका साकारत आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

दृष्टीक्षेपात झुलनची कारकीर्द

कसोटी ः सामने- 12, विकेट- 44

एकदिवसीय ः सामने- 204, विकेट- 255

टी-ट्वेंटी ः सामने - 68, विकेट- 56

''हा क्षण माझ्यासाठी खास आहे. मी माझ्या कारकीर्दीची सुरुवात २००२ मध्ये इंग्लंडमध्ये केली होती आणि कारकीर्दीची अखेरही इंग्लंडमध्येच होत आहे. बीसीसीआय, बंगाल क्रिकेट असोसिएशन, कुटूंबीय, प्रशिक्षक, कर्णधार यांनी ही संधी दिल्याबद्दल आभार. ''

- झुलन गोस्वामी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT