Bangladeshi In Goa: चार बांगलादेशी नागरिक ताब्यात, खोली भाड्याने देणाऱ्यांची देखील होणार चौकशी

 Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात बांगलादेशी नागरिकांचा (Bangladeshi Nationals In Goa) मुद्दा चांगलाच गाजत आहे. मडगाव पोलिसांच्या (Margao Police) विशेष पथकाने रविवारी चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन मुलांचा समावेश आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) म्हणाले, बांगलादेशी नागरिकांना खोली भाड्याने देताना त्यांचा भाडे करार करण्यात आला नाही. त्यामुळे बांगलादेशी नागरिकांना खोली भाड्याने देणाऱ्यांची देखील होणार चौकशी केली जाणार आहे. असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

मडगाव पोलिसांनी शाहीन फझल करीम (वय 40) आणि फझल करीम (वय 50) आणि दोन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे. नारायणगंज-बांगलादेश येथील हे नागरिक रहिवासी आहेत.

 Goa
PM Applaud Goa: पंतप्रधान मोदींकडून गोव्यातील किनारपट्टी स्वच्छता अभियानाचे कौतुक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गोव्यातील बांगलादेशी नागरिकांच्या बाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री म्हणाले, बांगलादेशी नागरिकांना खोली भाड्याने देताना संबधित कुटुंबियांनी भाडेकरार केला नाही. तसेच, भाडेकरूंची पडताळणी केली नव्हती.बांगलादेशी नागरिकांना खोली भाड्याने देणाऱ्यांची देखील होणार चौकशी केली जाणार आहे. वीस बांगलादेशी नागरिकांना आत्तापर्यंत अटक केली आहे. अजूनही बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

मुख्यमंत्री म्हणाले भाडेकरू ठेवत असताना त्याचे पोलिस व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. कोणीही भाडेकरू घेताना संबधित व्यक्ती कुठून आला, काय काम करतो याची माहिती घेणं गजचेचे आहे. अनेक जणांकडे पत्ता व्यवस्थित नसतो, खोटा पत्ता सादर करून लोकं राहतात. त्यातून चुकीच्या घटना, चोरीच्या घटना समोर येतात. त्यामुळे घरात भाडेकरू ठेवताना त्याचे पोलिस व्हेरिफिकेशन करणं गरजेचे आहे.

दरम्यान, कागदपत्र नसताना अधिककाळ राहिल्याप्रकरणी गोव्यातून बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. साखळी, वाळपोई, डिचोली, कोलवाळ आणि वार्का भागातून बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com