Cricket Match Lightning Accident Jharkhand Dainik Gomantak
क्रीडा

LIVE मॅचदरम्यान आकाशातून वीज कोसळली, एका खेळाडूचा जागीच मृत्यू; अनेकजण जखमी

Cricket Match Lightning Accident Jharkhand: अचानक सुरु झालेल्या पावसामुळे खेळाडू आणि प्रेक्षक आडोशाला जात असतानाच वीज कोसळली. या दुर्घटनेत प्रेम बाखला नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

Manish Jadhav

Cricket Match Lightning Accident Jharkhand: नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) झारखंडमधील आगमनासोबतच रविवारी (21 जून) राज्याला वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र, या पहिल्याच पावसात आकाशातून कोसळलेल्या विजेने राज्यात मोठा हाहाकार माजवला. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वीज कोसळण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या असून, यामध्ये एकूण आठ लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे डझनभर लोक गंभीर जखमी झाले. खूंटी जिल्ह्यातील कर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पतराटोली गावात क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

अचानक सुरु झालेल्या पावसामुळे खेळाडू आणि प्रेक्षक आडोशाला जात असतानाच वीज कोसळली. या दुर्घटनेत प्रेम बाखला नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तिथे उपस्थित असलेले अर्धा डझन तरुण जखमी झाले. जखमींना तातडीने कर्रा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, परंतु अंकित बाखला आणि जवकीम मिंज यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रांची येथील रिम्स रुग्णालयात हलवण्यात आले. खूंटी जिल्ह्यातील तोरपा भागातही शेतात काम करणारे ग्रामीण निस्तार टोपनो यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. या दोन्ही मृतदेहांचे पोस्टमार्टम करुन सरकारी नियमांनुसार पीडित कुटुंबांना भरपाई देण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली.

रामगढ जिल्ह्यातही विजेने दोघांचा बळी घेतला, ज्यात घराशेजारील पोल्ट्री फार्ममधून परतणारे गंगासागर महतो आणि शेतात काम करणारी चितरपूर येथील एका महिलेचा समावेश आहे. याशिवाय, गिरिडीहच्या निमडीह गावात एका महिला वॉर्ड सदस्याचा आणि सरिया येथील सीताराम हांसदा यांच्या पत्नीचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला. देवघर जिल्ह्यातील मोहनपूर येथील मुद्रिका देवी आणि साहिबगंज जिल्ह्यातील बरहेट येथे एका अल्पवयीन मुलीचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. अवघ्या आठवड्याभरापूर्वी 13-14 जून रोजी झालेल्या पावसातही (Rain) रांचीसह विविध जिल्ह्यांत अशाच प्रकारे आठ जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण आहे.

या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने राजधानी रांचीसह झारखंडच्या अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट जारी केला. येत्या 25 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असून तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घसरण होऊ शकते. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, पावसाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि उंच झाडे किंवा विजेच्या खांबांपासून दूर राहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi language: हरवलेली अमृताची रसाळ वाणी अन् मराठीची दशा

Goa Fish Market: निविदाच नाही, मग 'सोपो' कर कसा? बोटमालक संघटनेचा सवाल, 'एसजीपीडीए' मार्केटमधील घोळ

Goa Elder Abuse: "वडिलांचा छळ करणाऱ्या मुलगा-सुनेला घरातून बाहेर काढा!" लंडनस्थित मुलीची थेट पोलिसांकडे आक्रमक मागणी

Tuyem Health Centre: तुये आरोग्य केंद्रातील कामे पूर्ण करा; नागरिक कृती समितीतर्फे आरोग्य विभागाला निवेदन

Wari: विठ्ठलनामाचा गजर, पंढरीकडे वारकऱ्यांची वाटचाल; पिळगाव येथून प्रथमच निघाली पायीवारी, महिलांसह एकूण 160 जणांचा सहभाग

SCROLL FOR NEXT