Jeff Bezos: फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे फुटबॉलच्या एखाद्या संघाची मालकी असणे, ही मानाची गोष्टही मानली जाते. आता फुटबॉल विश्वात चर्चा होत आहे की अमेरिकेचे अब्जाधीश बिझनेसमन जेफ बेजोस अमेरिकेतील एक फुटबॉल संघ विकत घेऊ इश्चित आहेत आणि त्यासाठी ते वॉशिंग्टन पोस्ट विकणार आहेत.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस वॉशिंग्टन कमांडर्स संघ विकत घेण्यासाठी प्रसिद्ध वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्र विकणार आहेत.
एका अज्ञात सुत्राने सांगितले आहे की गेल्या महिन्यात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पब्लिशर फ्रेड रायनने अनियंत्रित टॉऊन हॉलमधील बैठकीत टाळेबंदी योजनांचा खुलासा करताना दिसले होते. या व्हिडिओनंतर बेजोस वॉशिंग्टन पोस्ट विकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
सध्या वॉशिंग्टन कमांडर्स संघाची मालकी डॅन स्नायडरकडे आहे. या संघाने 1983, 1988 आणि 1992 साली लोम्बार्डी ट्रॉफी जिंकली होती. दरम्यान, बेजोस यांच्यासाठी या संघाची मालकी मिळवणे सोपे नसणार आहे. कारण बेजोस यांच्यावर स्नायडर नाराज आहेत.
वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या काही वृत्तांमुळे स्नायडर नाराज आहेत. संघाच्या मॅनेजमेंटमधील वातावरणाबाबत काही वृत्त वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित झाले होते.
तसेच अनेक रिपोर्ट्सनुसार कमांडर्सने मागील आठवड्यात संभावित खरेदीदारांच्या पहिल्या फेरीतील बोली स्विकारल्या आहेत, पण यात बेजोस यांच्या नावाचा समावेश नव्हता.
(Jeff Bezos looking to sell The Washington Post to buy a football team claimed in media reports)
दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टच्या प्रवक्त्यांनी वृत्तपत्र विकले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बेजोस यांनी 2013 साली 250 मिलियन डॉलरला डोनाल्ड ग्रॅहम यांच्याकडून वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतले होते. बेजोस ब्लू ओरिजिन या स्पेस कंपनीचेही मालक आहेत.
महत्त्वाचे म्हणजे बेजोस यांनी यापूर्वी म्हटले होते की त्यांची एका वृत्तपत्राचा मालक होणे त्यांचे कधीही लक्ष्य नव्हते. तसेच त्यांनी अनेकदा म्हटले आहे की फुटबॉल त्यांचा आवडता खेळ आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.