Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India कडून तब्बल 12 वर्षांनी मिळणार कसोटी खेळण्याची संधी, गोलंदाज म्हणतोय...

बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल केले आहेत.

Pranali Kodre

Team India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात काही बदल केले. यात सौराष्ट्राचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याचीही निवड करण्यात आली.

त्यामुळे आता जयदेव भारतीय संघाकडून कसोटी खेळताना दिसू शकतो. त्याने यापूर्वी भारताकडून केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. तोही सामना त्याने 2010 साली खेळला होता. त्याने त्यावेळी डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनला हा सामना खेळला होता.

या सामन्यात जयदेवला एकही विकेट घेता आली नव्हती. त्याच्या विरुद्ध दक्षिण आफ्रिकेने १०१ धावा काढल्या होत्या. त्यानंतक जयदेवला गेल्या 12 वर्षांत भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आता त्याने गेल्या 3 वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या शानदार कामगिरीचे बक्षीस त्याला मिळाले आहेत.

त्यामुळे जयदेवनेही सोशल मीडियावर त्याला मिळालेल्या संधीबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले आहे की 'ओके, हे खरं वाटत आहे. हे त्यांच्यासाठी ज्यांनी माझ्यावर विश्वास कायम ठेवला आणि मला पाठिंबा कायम दिला. मी कृतज्ञ आहे.'

सौराष्ट्राकडून शानदार कामगिरी

जयदेवने गेल्या ३ वर्षात चांगली कामगिरी केली आहे. तो सौराष्ट्र संघाचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली नुकतेच सौराष्ट्र विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरले होते. तसेच 2019-20 ची रणीजी ट्रॉफीदेखील सौराष्ट्रने जिंकली. त्याआधीच्या हंगामात सौराष्ट्र रणजी ट्रॉफीचे उपविजेतेही होते. या सर्व स्पर्धांमध्ये जयदेवची कामगिरी महत्त्वाची होती.

त्याने गेल्या तीन रणजी ट्रॉफी हंगामात 21 सामने खेळताना तब्बल 115 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 2019-20 च्या हंगामा त्याने 10 सामन्यांत 67 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी तो एका रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला होता. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील ही लय पुढेही कायम ठेवली आहे. आता त्याला त्याच्या या कामगिरीचे फळ मिळाले असून तो आता भारताकडून कसोटी सामना खेळताना दिसू शकतो.

भारतीय संघात अन्य बदल

दरम्यान, भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी हे दुखापतग्रस्त आहेत. तसेच अष्टपैलू रविंद्र जडेजाचीही गुडघ्याच्या शस्त्रक्रिया झाली होती, त्यातून तो सावरत आहे.

याशिवाय कर्णधार रोहित शर्माला बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो आगामी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर पडला, तर दुसऱ्या सामन्यातील त्याच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहे.

त्यामुळे बीसीसीआयने त्याच्या जागेवर अभिमन्यू ईश्वरनची निवड केली आहे. तसेच शमी आणि जडेजा यांच्या जागेवर नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांची निवड केली आहे. त्याचबरोबर रोहित पहिल्या कसोटीतून बाहेर पडल्याने केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल आणि चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असेल.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 22 ते 26 डिसेंबरदरम्यान होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

SCROLL FOR NEXT