Javed Miandad Dainik Gomantak
क्रीडा

Imran Khan: 'मी इमरानला पंतप्रधान होण्यासाठी मदत केली पण...', माजी क्रिकेटरने व्यक्त केली खंत

Javed Miandad: एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांनी इम्रान खान यांना पंतप्रधान होण्यासाठी मदत केली, पण त्यांना त्याचा पश्चात्ताप होत आहे.

Ashutosh Masgaunde

Javed Miandad criticizes Imran Khan: आजकाल माजी पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानमध्ये राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनीही पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) अध्यक्षावर भाष्य केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांनी इम्रान खान यांना पंतप्रधान होण्यासाठी मदत केली, पण त्यांना त्याचा पश्चात्ताप होत आहे.

एआरवाय न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान क्रिकेटर जावेद मियांदादने खुलासा केला की त्याने पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना पंतप्रधान बनण्यास मदत केली. पण त्याने कधीही आभार मानले नाहीत याची खंत आहे.

एका प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, माझ्या वडिलांना क्रिकेटची खूप आवड होती, 'मी आणि माझे सर्व भाऊ रस्त्यावर तसेच गच्चीवर खेळायचो.'

इम्रान खानबद्दल बोलताना जावेद मियांदाद म्हणाले की, जेव्हाही तो राष्ट्रीय संघासाठी खेळला तेव्हा संघ हरला तर संघातील वाद कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला, ते म्हणाले की कोणत्याही खेळाडूने त्याच्या कर्णधारपदावर आक्षेप घेतला नाही.'

इम्रान खान ऑगस्ट 2018 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आणि 3 वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहिले. परंतु एप्रिल 2022 मध्ये त्यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे पदावरून हटवण्यात आले.

अलीकडे, इम्रान खानने शुभेच्छा शेअर करताना सांगितले की, यावर्षीचा ईद सण त्यांच्यासाठी 'सर्वात वेदनादायक' होता. कारण त्यांच्या सुमारे 10,000 समर्थकांना तुरुंगात गुन्हेगारांसारखे वागवले जात आहे.

9 मे रोजी अल-कादिर भ्रष्टाचार प्रकरणात अटक झाल्यानंतर इम्रान खानच्या समर्थकांनी लष्करी आस्थापना आणि सरकारी इमारतींवर हल्ले केले होते.

याआधीही मियांदाद यांनी इम्रान खान यांच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशाच्या आणि क्रिकेटच्या दुर्दशेसाठी त्यांनी इम्रान खानला जबाबदार धरले आहे. मी मदत केली नसती तर इम्रान पंतप्रधान झाले नसते, असेही त्यांनी म्हटले आहे.

वादाचा इतिहास

जावेद मियादाद यांच्या मुलाखतीनंतर, पाकिस्तानसाठी 19 कसोटी सामने आणि 50 एकदिवसीय सामने खेळलेल्या बासित अलीने म्हटले होते की, इम्रान खान जावेद मियांदादला संघाबाहेर ठेवू इच्छित होते.

बसील अली यांनी वसीम अक्रमला इम्रान खानचे कठपुतळी म्हटले आणि सर्व निर्णय इम्रान खान घ्यायचे अक्रमने त्यालाच पुढे केले होते. जावेद मियांदादने 1996 चा विश्वचषक खेळावा अशी इम्रान खानची इच्छा नव्हती, असेही बासित अली म्हणाले होते.

बासित अली म्हणाले की, इम्रान खान जाणूनबुजून त्यांची तुलना जावेद मियांदादशी करत असे, तर जावेद माझ्यापेक्षा अधिक प्रतिभावान होता. तसे, बासिल अलीने भारतीय कर्णधार अझरुद्दीनला पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूमचा लाडका देखील म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT