Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहपूर्वी कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही असा रेकॉर्ड बुमराहने आपल्या नावे केला आहे. जसप्रीत बुमराहच्या धडाकेबाज गोलंदाजीसमोर मोठ्यातल्या मोठ्या फलंदाजाचा थरकाप उडतो. (Jasprit Bumrah Record)
जसप्रीत बुमराहने इतिहास रचला
जसप्रीत बुमराह हा T20 क्रिकेटमध्ये भारताकडून 250 विकेट घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहपूर्वी टीम इंडियाचा कोणताही वेगवान गोलंदाज हा ऐतिहासिक रेकॉर्ड गाठू शकलेला नाही.
भारतासाठी हा पराक्रम करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला
मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात वॉशिंग्टन सुंदर बाद होताच जसप्रीत बुमराहने हा विक्रम केला आहे. जसप्रीत बुमराहने 206 टी-20 सामन्यात 250 विकेट घेतल्या आहेत.
रविचंद्रन अश्विनच्या नावावर हा विक्रम आहे
T20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजाबद्दल विचार केला तर हा विक्रम महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या नावावर आहे. रविचंद्रन अश्विनने T20 क्रिकेटमध्ये 274 विकेट घेतल्या आहेत. बुमराहच्या आधी भुवीने टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. भुवीच्या नावावर 223 टी-20 विकेट आहेत. जयदेव उनाडकटने 201 तर विनय कुमारने 194 विकेट्स घेतल्या आहेत. इरफान पठाण टी-20 क्रिकेटमध्ये 173 विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.