आयपीएलचा 15वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या थरारक स्पर्धेत अनेक खेळाडूंनी बॅट आणि बॉलने चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर काहींनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान काही खेळाडूंना दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. रवींद्र जडेजा, पॅट कमिन्स आणि सूर्यकुमार यादव यांच्या दुखापतींमुळे त्यांच्या फ्रँचायझींचेच नुकसान झाले असे नाही तर राष्ट्रीय संघांची चिंताही वाढली आहे. (Players who got injured in IPL 2022)
रवींद्र जडेजा: मोसमातील आठ सामन्यांमध्ये चेन्नईचे नेतृत्व करणारा जडेजा बरगडीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला. त्याच्या दुखापतीबाबत अधिक माहिती समोर आलेली आलेली नाही. जडेजा राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये आपल्या फिटनेसवर काम करेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होम सीरिज खेळण्यासोबतच टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी जडेजा तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे.
सूर्यकुमार यादव: आयपीएलच्या आधी दुखापत झालेला सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून पहिल्या काही सामन्यात खेळला नव्हता. त्याने दुखापतीतून उल्लेखनीय पुनरागमन केले आणि आठ सामन्यांत 43 च्या सरासरीने 303 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 146 होता. 6 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात स्नायू दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव बाहेर पडला होता. हा खेळाडू जवळपास चार आठवडे व्यावसायिक क्रिकेटपासून दूर असेल. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे.
अजिंक्य रहाणे: खराब फॉर्ममुळे भारतीय कसोटी संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेला आयपीएलमधून फॉर्ममध्ये परतण्याची सुवर्णसंधी होती. या संधीचा त्याने फायदा उठवला नाही. त्याला सात सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने 19 च्या सरासरीने 133 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 103.90 होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रहाणेला दुखापत झाली होती. धाव घेताना त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. त्याला काही दिवस खेळापासून दूर राहावे लागणार आहे. रहाणेला 6 जून रोजी होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळून फॉर्ममध्ये परतण्याची संधी आहे.
पॅट कमिन्स: कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी खेळाडू पॅट कमिन्सलाही दुखापत झाली आहे. आपला कसोटी कर्णधार लवकरात लवकर तंदुरुस्त होईल, अशी ऑस्ट्रेलियाची अपेक्षा आहे. कांगारू संघाला श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाची नजर कमिन्सवर असेल.
टायमल मिल्स: मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सलाही दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले. त्याच्या घोट्याला दुखापत झाली आहे. या हंगामात मिल्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्याने पाच सामन्यांत फक्त सहा विकेट घेतल्या. या काळात ते खूप महागडेही ठरले. त्याचा इकॉनॉमी रेट 11.19 इतका होता. गेल्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत बाहेर पडलेल्या इंग्लंड संघाचा मिल्स सदस्य होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.