Jasprit Bumrah X/BCCI
क्रीडा

Jasprit Bumrah: वर्ल्डकपमध्ये बुमराहचा जलवा! पहिल्याच चेंडूवर विकेट घेत झहिर-मॅकग्राच्या यादीत मानाचं स्थान

Video: जसप्रीत बुमराहने वर्ल्डकपमध्ये सलग 13 सामन्यात विकेट घेतल्या आहेत.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Sri Lanka, Jasprit Bumrah Record:

भारत विरुद्ध श्रीलंका संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना गुरुवारी पार पडला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 302 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. भारताच्या या विजयात जसप्रीत बुमराहनेही महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात भारताकडून श्रीलंकेची पहिलीच विकेट पहिल्याच चेंडूवर घेतली. त्यामुळे त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये सलग 13 डावात विकेट घेण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

बुमराहने वर्ल्डकपमध्ये 16 सामने खेळले आहेत. त्याने त्याच्या पहिल्या दोन सामन्यात विकेट घेतल्यानंतर तिसऱ्या सामन्यात एकही विकेट घेतली नव्हती. पण त्यानंतर त्याने खेळलेल्या सर्व 13 सामन्यात किमान एक तरी विकेट घेतली आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सलग डावात विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचाच मिचेल स्टार्क अव्वल क्रमांकावर आहे. त्याने वर्ल्डकपमध्ये सलग 23 सामन्यांमध्ये किमान एक तरी विकेट घेतली होती.

त्याची ही विकेट घेण्याची साखळी नुकतीच 28 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळताना तुटली. त्याला न्यूझीलंडविरुद्ध कारकिर्दीतील 24 वा वनडे वर्ल्डकप सामना खेळताना एकही विकेट घेता आली नाही.

दरम्यान, बुमराह वनडे वर्ल्डकपमध्ये सलग 13 सामन्यात विकेट घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज बनला आहे. त्याने झहिर खानच्या विक्रमाला मागे टाकले आहे. झहिरने सलग 12 सामन्यात विकेट्स घेतल्या होत्या.

भारताचा विजय

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या होत्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 92 धावा केल्या, तर विराट कोहलीने 88 धावांची आणि श्रेयस अय्यरने 82 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना दिलशान मदुशंकाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकात 55 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून कसून रजिताने 14 धावा, महिश तिक्षणाने नाबाद 12 धावा आणि अँजेलो मॅथ्युजने 12 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. श्रीलंकेचे 5 फलंदाज शुन्यावर बाद झाले.

भारताकडून मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने 3 विकेट्स, तर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT