Jasprit Bumrah - Mohammed Siraj X/BCCI
क्रीडा

SA vs IND: सिराजने दिले श्रेय, पण बुमराहच्या उत्तराने जिंकली मनं, Video होतोय व्हायरल

Mohammed Siraj - Jasprit Bumrah: सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर सिराजचा दुभाषी म्हणून बुमराह बोलायला आला होता. यावेळी त्यांच्या मुलाखतीने अनेकांची मने जिंकली आहेत.

Pranali Kodre

Mohammed Siraj - Jasprit Bumrah Video:

भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात दीडच दिवसात गुरुवारी (4 जानेवारी) 7 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना अवघ्या 107 षटकात संपला, त्यामुळे तो कसोटी इतिहासातील सर्वात छोटा सामनाही ठरला. याबरोबरच भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरीही साधली.

या सामन्यात 7 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजला सामनावीर पुरस्कार देण्यात आला, तर मालिकेत 12 विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

दरम्यान, सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर सिराजसह त्याचा दुभाषी म्हणून बुमराह प्रेझेंटेटरशी बोलायला आला होता. यावेळी त्यांच्या मुलाखतीने अनेकांची मने जिंकली आहेत. यावेळी सिराजने त्याच्या चांगल्या गोलंदाजीबद्दल बुमराहला श्रेयही दिले. मात्र, बुमराहने मोठे मन दाखवत त्याने बोललेला तो भाग गाळत सिराजच्या प्रतिक्रियाचे भाषांतर केले.

जेव्हा प्रेझेंटेटरच्या प्रश्नावर सुरुवातीला उत्तर देताना सिराज इंग्लिशमध्येच बोलायला लागला.

त्याने सांगितले, 'कसोटी क्रिकेटमधील ही माझी सर्वोत्तम कामगिरी आहे. मी सातत्य राखण्याचा, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा आणि खूप विचार न करण्याचा प्रयत्न केला. मी मागच्या सामन्यात सातत्य दाखवू शकलो नव्हतो आणि त्याचमुळे आम्ही खूप धावाही खर्च केल्या. मी माझ्या सातत्यावर आणि माझ्या टप्प्यावर काम केले. त्यामुळे मला फायदा झाला.'

दरम्यान, सिराजला इंग्लिशमध्ये बोलताना पाहून अखेर दुभाषी म्हणून आलेला बुमराह मजने म्हणाला, 'भाई हिंदीमध्येही बोल.' त्यानंतर सिराजही हसायला लागला. यानंतर सिराजने बोलताना बुमराहचे सल्लेही फायदेशीर ठरतात असे सांगत त्यालाही श्रेय दिले. यावेळी तो हिंदीत बोलला.

तो म्हणाला, 'जस्सी भाई नेहमीच जशी सुरुवात करतो, तेव्हा एक मेसेज मिळतो की खेळपट्टी कशी आहे आणि कोणता टप्पा आणि दिशा योग्य असेल. त्यामुळे जर मी त्यावरच काम केले, तर मला जास्त विचार करण्याची गरज पडत नाही.'

दरम्यान, या प्रतिक्रियेचे इंग्लिंश भाषांतर करताना बुमराहने थोडा बदल केला. सिराजने त्याला दिलेले श्रेय त्याने त्यातून गाळले आणि त्याजागी तो म्हणाला, 'आम्ही एकत्र खेळतो, त्यामुळे माझ्या अनुभवामुळे आधीच मेसेज मिळतो.'

'आम्ही लवकर खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आमच्या गोलंदाजी फळीत खेळपट्टी कशी असेल आणि आपण त्यावर काय करायला हवे याची चर्चा होते. त्यामुळे त्याचा त्याला फायदा होतो.'

दरम्यान, बुमराहने केलेल्या या भाषांतराने अनेकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT