Jasprit Bumrah - R Ashwin X/StarSportsIndia
क्रीडा

Jasprit Bumrah: जेव्हा अश्विनच्या समोरच बुमराह करतो गोलंदाजीची नक्कल, पाहा Video

R Ashwin: दक्षिण आफ्रिकेत सराव करत असताना जसप्रीत बुमराह आर अश्विनच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसला होता.

Pranali Kodre

Jasprit Bumrah Imitates R Ashwin's Bowling Action ahead of South Africa vs India Cape Town Test:

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (3 जानेवारी) सुरु झाला आहे. हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियममध्ये खेळवला जात आहे.

दरम्यान या सामन्यापूर्वीचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओ भारतीय संघाच्या सरावादरम्यानचा आहे.

दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ सराव करत असताना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अनुभवी फिरकीपटू आर अश्विनच्या गोलंदाजी शैलीची नक्कल केली. यावेळी अश्विन त्याच्या मागेच उभा होता. या घटनेचा व्हिडिओ कसोटी मालिकेचे प्रसारक स्टार स्पोर्ट्सने शेअर केला आहे. या व्हिडिओ अनेक कमेंट्सही येत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या सामन्याला केपटाऊनमध्ये सुरुवात झाली आहे. या सामन्यासाठी आर अश्विनला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. त्याला सेंच्युरियनला झालेल्या पहिल्या कसोटीत फार काही करता आले नव्हते. त्याच्या जागेवर अष्टपैलू रविंद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. जडेजा पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे खेळला नव्हता.

तथापि, जसप्रीत बुमराह प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम आहे. त्याने पहिल्या सामन्यातही शानदार गोलंदाजी करताना 4 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच बुमराहने केपटाऊनमध्ये चालू असलेल्या कसोटी सामन्यातही पहिल्या डावात चांगली गोलंदाजी करताना 8 षटकात 25 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आहेत. केपटाऊन कसोटीत पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ 55 धावांवर सर्वबाद झाला. या डावात बुमराह व्यतिरिक्त मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेतल्या, तर मुकेश कुमारने २ विकेट्स घेतल्या.

भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघाने सेंच्युरियन कसोटीत डावाने विजय मिळवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान आहे.

या मालिकेत भारताला विजयाची संधी नाही, पण जर भारताने दुसरा सामना जिंकला, तर मालिका बरोबरीत सोडवण्याच भारतीय संघ यशस्वी होईल. मात्र हा सामना अनिर्णित राहिला किंवा भारताने पराभव स्विकारला, तर दक्षिण आफ्रिका मालिका जिंकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विरोधी पक्षांचे नेते 'नर्व्हस' की 'ओवरकॉन्फिडेंट'? स्वार्थासाठी युती तोडली, भाजपला आयती संधी!

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

Goa Today News Live: लुथरा बंधु थायलंडमधून डिपोर्ट; दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिस दोघांना घेणार ताब्यात

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

SCROLL FOR NEXT