Jasprit Bumrah has broken Zaheer Khan's record in Tests mach  Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: बूम बूम बुमराहची करामत! 'झहीर खान'ला मागे टाकत नोंदवला विक्रम

इंग्लंडमध्ये भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आता दुसऱ्या स्थानावर आला आहे.

दैनिक गोमन्तक

जगातील सर्वात आक्रमक गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) नाव का घेतले जाते, हे त्याने इंग्लंडविरुद्धच्या (England) पहिल्या कसोटी सामन्यात सिद्ध केले. बुमराहने इंग्लंडच्या विरुद्धच्या या सामन्यात एकूण 9 बळी घेतले. पहिल्याच डावात त्याने इंग्लंडच्या चार फलंदाजांना बाद केले, तर दुसऱ्या डावात जवळपास अर्ध्या संघाला म्हणजेच पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे बुमराहने यावेळी आपल्या गोलंदाजीच्या बळावर त्याने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचा विक्रम मोडला. दुसरीकडे, इंग्लंडने पहिल्या डावात 183 धावा आणि दुसऱ्या डावात 303 धावा केल्या. (Jasprit Bumrah has broken Zaheer Khan's record in Tests mach)

इंग्लंडमध्ये भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत जसप्रीत बुमराह आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत दोन डावात 110 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या. त्याच्या आधी झहीर खानने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर होता. झहीर खानने दोन डावात 134 धावा देऊन 9 बळी घेतले होते, पण बुमराहच्या या कामगिरीनंतर तो आता तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. कसोटीत सामन्यात इंग्लंडच्या मैदानात आजवर भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू म्हणजे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा, चेतनने कसोटी सामन्यात दोन डावात 188 धावा देऊन 10 विकेट्स घेतल्या होत्या.

इंग्लंडमध्ये भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 3 गोलंदाज

10/188 - चेतन शर्मा

9/110 - जसप्रीत बुमराह

9/134 - झहीर खान

भारतीच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकूण 20 विकेट्स घेतल्या. मात्र या सामन्यात फिरकीपटू रविंद्र जडेजाला कोणतेही यश मिळाले नाही. पहिल्या डावात बुमराहने चार, शमीने तीन, शार्दुलने दोन आणि सिराजने एक विकेट घेतली, तर दुसऱ्या डावात बुमराहने पाच, सिराज आणि शार्दुलने प्रत्येकी दोन तर शमीने एक बळी घेतला. संघातील एकमेव फिरकीपटू जडेजाला मात्र, यावेळी अपेक्षित यश मिळाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT