Jaspreet Bumrah & Sanjana Ganesan Dainik Gomantak
क्रीडा

'संजना लवकर परत ये,' बुमराह ने लिहिली पत्नीसाठी सोशल मीडिया पोस्ट

जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आता आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियामध्ये यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडल्यानंतर भारताचा नंबर वन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सचा हा स्टार सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. मात्र, बुमराह (Jaspreet Bumrah) या क्वारंटाईन कालावधीमध्ये पत्नी आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनला (Sanjana Ganesan) खूप मिस करत आहे. त्याने आपल्या पत्नीसाठी सोशल मीडियावर (Social Media) एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या चाहत्यांनाही सांगितले की, 'मी संजनाला खूप मिस करत आहे.' (Jaspreet Bumrah has written an emotional post on social media for his wife Sanjana Ganesan)

विशेष म्हणजे, बुमराहने संजनासोबतचा लग्नातील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही पारंपारिक कपड्यांमध्ये आणि एकमेकांकडे हसताना दिसत आहेत. बुमराहने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लवकर परत ये. आपले विनोद तुला खूप मिस करत आहेत.' बुमराहची पत्नी स्पोर्ट्स अँकर आहे. सध्या ती महिला विश्वचषक चालू असल्यामुळे न्यूझीलंडमध्ये आहे. आयपीएल दरम्यान ती मुंबई इंडियन्समधील (Mumbai Indians) इतर खेळाडूंच्या कुटुंबीयांसह टीमला चिअर करताना दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mining Transport: धूळ, चिखल आणि रात्रीची धडधड! पावसाळ्यात खनिज वाहतूक बंद करा; पिळगावच्या सारमानस भागातील नागरिकांचा एल्गार

Goa Government: नारी शक्ती ते गरीब कल्याण! मुख्यमंत्री सावंतांनी मांडली भाजप सरकारच्या कारभाराची 4 प्रमुख सूत्रे; 12 वर्षांच्या विकासाचे भव्य प्रदर्शन

Konkan Railway: गर्दीचा खेळ खल्लास, प्रवास होणार सुपरफास्ट! कोकण रेल्वेचा 4,704 कोटींचा 'मास्टर प्लॅन'; गोव्यातील रेल्वे सुविधांवर विशेष भर

Viral Video: "स्वतः मरणार नाहीत, पण दुसऱ्याचा जीव घेतील!", खतरनाक व्हिडिओ बघून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर; स्टंटबाज बाबाचा अजब कारनामा व्हायरल

भारताने रचला नवा इतिहास! संरक्षण उत्पादनाने गाठला 1.78 लाख कोटींचा सर्वकालिक उच्चांक; स्वदेशी लष्करी ताकदीचा जागतिक डंका

SCROLL FOR NEXT