Jaspreet Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: जसप्रीत बुमराह म्हणाला...'डे-नाईट कसोटी सामन्यांसाठी निश्चित सूत्र नाही'

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना शनिवारपासून बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु होत आहे.

दैनिक गोमन्तक

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना शनिवारपासून बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु होत आहे. हा सामना डे- नाईट (Day-Night Test) असणार आहे. अशा डे-नाईट सामन्यांचं फॉरमॅट चांगलंच लोकप्रिय आहे. त्यामुळेच चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी अशा डे-नाईट कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात येते. परंतु या सामन्यात वेगळी आव्हाने आहेत. हा सामना लाला चेंडूने नाही तर गुलाबी चेंडूने खेळला जातो. दुसरीकडे या फॉरमॅटमध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल खेळाडूंनी अनेकवेळा आपली मते नोंदवली आहेत. (Jaspreet Bumrah Has Said That It Is Impossible To Set A Set Parameter For Day Night Matches)

यातच आता आता भारतीय संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) शुक्रवारी सांगितले की, 'गुलाबी चेंडूवर कसोटी सामना खेळताना क्रिकेटपटूंना मानसिकदृष्ट्या जुळवून घ्यावे लागते. परंतु त्यासंबंधी कोणतेही निश्चित निकष नाहीत, कारण आतापर्यंत खेळलेल्या तीनही डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये परिस्थिती वेग-वेगळी होती.'

दरम्यान, भारताने आतापर्यंत फक्त तीन डे- नाईट कसोटी सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्ध खेळला जाणारा सामना हा त्यांचा या फॉरमॅटमधील चौथा सामना असणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने बांगलादेश, ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंडविरुद्ध (England) गुलाबी चेंडूवर सामने खेळले आहेत.

प्रत्येक वेळी स्थिती वेगळी

बुमराह म्हणाला की, 'टीम इंडियाने (Team India) जेव्हा-जेव्हा डे-नाईट कसोटी सामने खेळले आहेत, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागला आहे.'

बुमराह पुढे म्हणाला, “आम्ही गुलाबी चेंडूने जास्त सामने खेळलो नाही. मी जेव्हाही खेळलो तेव्हा परिस्थिती वेगळी राहिली आहे.

शिवाय, भारताने पहिला डे-नाईट कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात भारताने 46 धावांनी विजय मिळवला होता. भारताने आपला दुसरा डे-नाईट कसोटी सामना अ‍ॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आहे. परंतु या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यानंतर भारताने गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध तिसरा डे-नाईट कसोटी सामना खेळला आणि 10 गडी राखून विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT