IND vs SL: शेन वॉर्नच्या 'रॉकस्टार' ने मोडला कपिल देव यांचा 36 वर्षांचा विक्रम

टीम इंडियाच्या (Team India) या 'रॉकस्टार' अष्टपैलूने शानदार खेळी करत भारताला पहिल्या डावात मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaDainik Gomantak
Published on
Updated on

मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस रवींद्र जडेजाच्या नावावर होता. टीम इंडियाच्या (Team India) या 'रॉकस्टार' अष्टपैलूने शानदार खेळी करत भारताला पहिल्या डावात मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. जडेजाने (Ravindra Jadeja) 175 धावांची जबरदस्त खेळी (Unbeaten) केली. यातच त्याने महान भारतीय अष्टपैलू कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. (Ravindra Jadeja Breaks Kapil Devs Record In The First Test Between India And Sri Lanka In Mohali)

दरम्यान, रवींद्र जडेजाने मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात शतक पूर्ण केले, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक होते. यानंतर, त्याने दुसऱ्या सत्रातही आपली शानदार फलंदाजी सुरु ठेवली आहे. डाव घोषित होण्यापूर्वी 175 धावा केल्या, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी तर ठरलीच परंतु 36 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्ये जडजेना सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम केला. त्याच्या आधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता, ज्यांनी 1986 मध्ये श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 163 धावा केल्या होत्या.

Ravindra Jadeja
IND vs SL: 100 व्या कसोटीत कोहली करणार 'विराट रिकॉर्ड'

शिवाय, 175 धावांच्या खेळीत जडेजाने 228 चेंडूंचा सामना केला आणि 17 चौकारांसह 3 षटकारही ठोकले. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने 574/8 धावसंख्येवर डाव घोषित केला. मोहालीच्या मैदानावरील कसोटीतील भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी 2005 मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 516 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com