Jason Holder Dainik Gomantak
क्रीडा

IPL च्या मेगा लिलावापूर्वी 'या' खेळाडूने केला T20 मध्ये वर्ल्ड रिकार्ड

निर्णायक सामन्यात माजी कर्णधार जेसन होल्डरच्या (Jason Holder) हॅट्ट्रिकच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिका जिंकली.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15 व्या हंगामाच्या मेगा लिलावापूर्वी, सर्व फ्रेंचायझी संघ जगभरातून लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघांमधील पाच सामन्यांच्या मालिकेत निकराची लढत पाहायला मिळाली ज्यात यजमानांनी विजय मिळवला. निर्णायक सामन्यात माजी कर्णधार जेसन होल्डरच्या (Jason Holder) हॅट्ट्रिकच्या जोरावर वेस्ट इंडिजने (West Indies) मालिका जिंकली. संपूर्ण मालिकेत या खेळाडूने चमकदार कामगिरी करत विक्रमी कामगिरी केली. (Jason Holder Sets World Record In T20 Series Between England And West Indies)

दरम्यान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात होल्डरने सलग चार चेंडूत चार बळी घेतले. यामध्ये त्याने सामन्यात 2.5 षटकात 27 धावा देत एकूण 5 बळी घेतले. इंग्लंडच्या डावातील शेवटच्या षटकात होल्डरने दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग चार विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 4 बाद 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 162 धावांवर सर्वबाद झाला.

होल्डरने विश्वविक्रम केला

5 सामन्यांच्या T20 मालिकेदरम्यान, होल्डरने एकूण 15 विकेट घेतल्या. याआधी द्विपक्षीय मालिकेदरम्यान कोणत्याही खेळाडूने इतक्या विकेट्स घेतल्या नाहीत. 2019 मध्ये सोहेल खानने मोझांबिकविरुद्ध 14 विकेट घेतल्या होत्या. तर 2021 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी न्यूझीलंडच्या (New Zealand) ईश सोधीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 13 विकेट घेतल्या होत्या.

मेगा लिलावात या खेळाडूवर सर्वांच्या नजरा

गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या होल्डरने अलीकडच्या काळात चांगला खेळ दाखवला आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावात सर्वांच्या नजरा वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूवर असतील. त्याला हैदराबाद संघाने कायम ठेवलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT