Jannik Sinner  X/ATP
क्रीडा

Australian Open: 22 वर्षीय सिन्नरचं विजेतेपद जिंकून देणारं कमबॅक! ऑस्ट्रेलियन ओपनला मिळाला नवा विजेता

Jannik Sinner: ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत 22 वर्षांच्या सिन्नरने पहिले दोन सेट गमावल्यानंतरही शानदार पुनरागमन करत विजेतेपदाला गवसणी घातली.

Pranali Kodre

Jannik Sinner won Australian Open 2024 :

इटलीच्या 22 वर्षीय टेनिसपटू जॅनिक सिन्नरने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. त्याने रविवारी (28 जानेवारी) झालेल्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवला पराभवाचा धक्का दिला.

सिन्नरने मेदवेदेवला तीन तास 44 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात 3-6,3-6,6-4,6-4,6-3 अशा पाच सेटमध्ये पराभूत करत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमचे विजेतेपद जिंकले.

या विजेतेपदामुळे सिन्नर 1976 नंतर ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिलाच इटलीचा टेनिसपटू आहे, तर एकूण तिसरा इटलीच्या खेळाडू आहे. यापू्र्वी अखेरीस इटलीच्या एड्रियानो पनाट्टाने 1976 साली ग्रँडस्लॅम जिंकले होते.

सिन्नरने या विजयानंतर म्हटले की 'मला खूप अभिमान वाटत आहे. हा कठीण सामना होता. त्याने खूप चांगली सुरुवात केली होती. त्याने मला पूर्ण कोर्टवर फिरायला लावले.'

'मी सुरुवातीला माझ्या गेम प्लॅन योग्य पद्धतीने अंमलात आणू शकत नव्हतो. पण तिसऱ्या सेटमध्ये मी छोट्या संधी शोधल्या. सामना पालटला आणि मी आता खूप खूश आहे. खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. मी बसून त्या भावनांना वाच करून देईल, पण हे खूप अविश्वसनीय आहे.'

सिन्नरने नंतर त्याच्या टीमचे आणि कुटुंबाचे आभार मानले.

सिन्नर पहिले दोन सेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा ओपन एरामधील दुसराच खेळाडू आहे. यापूर्वी असे राफेल नदालने केले आहे.

सिन्नरने अंतिम सामन्यात पहिले दोन सेट सहज गमावले होते. परंतु, तिसऱ्या सेटमध्ये सिन्नरने शानदार पुनरागमन करत आपले आव्हान जिवंत ठेवले. त्याने चौथा सेटही जिंकून सामन्यात बरोबरी केली. त्यामुळे हा सामना निर्णायक सेटमध्ये गेला होता.

निर्णायक आणि पाचव्या सेटमध्येही सिन्नरने मेदवेदेवला वरचढ होण्याची संधी दिली नाही आणि पहिल्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली.

विशेष म्हणजे सिन्नरने या स्पर्धेत उपांत्य फेरीत दिग्गज नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. तसेच मेदवेदेवने उपांत्य फेरीत ऍलेक्झँडर झ्वेरेवला ५ सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.

विशेष म्हणजे मेदवेदेवने उपांत्य फेरीत पहिले दोन सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत विजय मिळवला होता. मात्र अंतिम सामन्यात तो विरुद्ध बाजूला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT