Australian Open: जोकोविच सेमीफायनलमध्ये पराभूत! 22 वर्षीय खेळाडूने केला मोठा उलटफेर

Novak Djokovic: तब्बल 33 सामन्यांनंतर 24 ग्रँडस्लॅम विजेत्या नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे.
Novak Djokovic
Novak DjokovicX/AustralianOpen
Published on
Updated on

Jannik Sinner beats Novak Djokovic to reach his first Grand Slam final at Australian Open 2024:

मेलबर्नमध्ये चालू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत शुक्रवारी (26 जानेवारी) मोठा उलटफेर झाला आहे. 24 ग्रँडस्लॅम विजेता सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला.

अव्वल मानांकित जोकोविचला इटलीच्या जॅनिक सिन्नरने पराभवाचा धक्का दिला. २२ वर्षीय सिन्नरने जोकोविचला 6-1, 6-2, 6-7(6), 6-4 अशा फरकाने चार सेटमध्ये पराभूत करत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. सिन्नर ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहचणारा पहिला इटलीचा टेनिसपटू आहे.

या पराभवामुळे जोकोविचची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत अपराजित राहण्याची मालिका तब्बल 33 सामन्यांनंतर खंडीत झाली आहे. यापूर्वी जोकोविचन ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 2018 साली पराभूत झाला होता. त्यानंतर तो आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अपराजीत होता.

Novak Djokovic
Novak Djokovic: 'आता एकत्र खेळू...', विराटने पहिल्या मेसेजबद्दल खुलासा केल्यानंतर जोकोविचं ट्वीट चर्चेत

जोकोविच यंदा 11 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे, तर एकूण 25 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याच्या हेतूने मैदानात उतरला होता. मात्र यासाठी त्याला आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

याशिवाय 2005 नंतर पहिल्यांदाच असे होणार आहे की ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविच किंवा रॉजर फेडरर किंवा राफेल नदाल खेळणार नाहीत. 2005 नंतर झालेल्या प्रत्येक ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत या तिघांपैकी किमान एक जण तरी अंतिम सामन्यात खेळले आहेत.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर 3 तास 22 मिनिटे चाललेल्या सामन्यात चौथ्या मानांकित सिन्नरने पूर्णपणे जोकोविचवर वर्चस्व ठेवले होते. त्याने जोकोविचला अनेकदा चूका करण्यास भाग पाडले. जोकोविचने 54 अनफोर्स एरर केले. सिन्नरने कणखर मानसिकता दाखवत जोकोविचला वरचढ होण्याची संधी दिली नाही.

Novak Djokovic
Australian Open: बोपन्नाची एब्डेनसह फायनलमध्ये धडक! दोन तासाच्या लढाईनंतर जिंकली थरारक सेमीफायनल

पहिला आणि दुसरा सेट तर सिन्नरने सहज जिंकला होता. मात्र तिसऱ्या सेटमध्येही जोकोविचने पुनरागमन केले. त्याने हा सेट 6-6 अशा बरोबरीत आणण्यासाठी मोठे प्रयत्न केल्यानंतर हा सेट टायब्रेकरमध्ये जिंकला.

मात्र त्यानंतरही सिन्नरने त्याला चौथ्या सेटमध्ये पुन्हा वर्चस्व ठेवू दिले नाही आणि चौथा सेट जिंकत जोकोविचला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे जोकोविचचे या स्पर्धेतील आव्हान संपले असून सिन्नर आता रविवारी पहिल्या ग्रँडस्लॅम विजयासाठी खेळेल.

त्याचा सामना ऍलेक्झँडर झ्वेरेव किंवा डॅनिल मेदवेदेव यांच्यापैकी एकाशी होईल. झ्वेरेव आणि मेदवेदेव यांच्या दुसरा उपांत्य सामना होणार असून त्यांच्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात पोहोचेल.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जरी जोकोविचचा पराभव झाला असला, तरी तो जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम राहणार आहे. तसेच जर सिन्नरने अंतिम सामना जिंकला, तर तो क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com