Jamshedpur vs Goa Dainik Gomantak
क्रीडा

Jamshedpur vs Goa: 'एफसी गोवा'चे तिसऱ्या विजयाचे लक्ष; आता भिडणार 'जमशेदपूर'ला

सामना पूर्णतः वेगळा - पेनया

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जमशेदपूर एफसीला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग सात पराभवांच्या नामुष्कीस सामोरे जावे लागले. याउलट एफसी गोवा संघाने गेल्या सलग दोन लढती जिंकताना आत्मविश्वास परत मिळविला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. 22) जमशेदपूर येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुल मैदानावर गोव्यातील संघाला गुणतक्त्यातील स्थिती सुधारण्याची आणखी एक संधी मिळेल.

(Jamshedpur FC will play a match against FC Goa in the Indian Super League football tournament)

एफसी गोवाने 10 पैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यांचे सध्या 18 गुण आहेत. जमशेदपूरने 10 पैकी आठ सामने गमावले असून सध्या ते फक्त चार गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहेत. गतमहिन्यात फातोर्डा येथे झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीत इकेर ग्वोर्रोचेना, नोआ सदावी व ब्रायसन फर्नांडिस यांच्या गोलमुळे कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने जमशेदपूरचा 3-0 फरकाने धुव्वा उडविला होता. ऐडी बूथरॉईड यांच्या मार्गदर्शनाखालील संघ अजूनही संघर्ष करताना दिसत आहे.

सामना पूर्णतः वेगळा - पेनया

सध्या परिस्थिती एफसी गोवासाठी अनुकूल असली, तरी प्रशिक्षक कार्लोस पेनया आपल्या संघाच्या मागील कामगिरीस महत्त्व देण्यास तयार नाहीत. गुरुवारचा सामना पूर्णतः वेगळा असल्याचे त्यांचे मत आहे. ‘‘मला खूपच मोठे आव्हान अपेक्षित आहे. गतमहिन्यातील जमशेदपूर एफसी संघ आता नाही, त्यांच्यात किंचित बदल झाला आहे, यामध्ये परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.

याशिवाय आम्ही घरच्या मैदानावर खेळलो होतो, तर ते आता त्यांच्या मैदानात खेळतील आणि त्यांना चाहत्यांचा पाठिंबा मिळेल,’’ असे पेनया सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाले. प्रतिस्पर्ध्यांसाठी सध्याचा काळ खडतर असला, तरी त्यांचा संघ चांगला असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.

मैदानात उतरण्यापूर्वी...

एकमेकांविरुद्ध आयएसएल स्पर्धेत 11 सामने

एफसी गोवाचे 6, जमशेदपूरचे 4 विजय, 1 लढत बरोबरीत

3 नोव्हेंबर 2022 रोजी फातोर्डा येथे एफसी गोवा 3-0 फरकाने विजयी

यंदा एफसी गोवाचे 17 गोल, तर जमशेदपूर एफसीचे फक्त 6 गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT