Jamshedpur defeated Team ATK Mohan Bagan in ISL
Jamshedpur defeated Team ATK Mohan Bagan in ISL Dainik Gomantak
क्रीडा

जमशेदपूर आयएसएल ‘शिल्ड’चे मानकरी

दैनिक गोमन्तक

पणजी ः रित्विक दास याने उत्तरार्धात नोंदविलेल्या निर्णायक गोलच्या बळावर जमशेदपूर एफसीने सलग सातवा विजय नोंदवून आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत लीग विनर्स शिल्डचा मान मिळवला.

सोमवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जमशेदपूरने स्पर्धेतील शेवटच्या साखळी लढतीत एटीके मोहन बागानला 1-0 फरकाने हरविले, त्यामुळे कोलकात्याच्या संघाची अपराजित मालिका खंडित झाली.

रित्विक याने महत्त्वपूर्ण गोल 56व्या मिनिटास केला. या 25 वर्षीय मध्यरक्षकाचा हा मोसमातील चौथा गोल ठरला. त्यामुळे ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने स्पर्धेतील एकंदरीत 13वा विजय नोंदविला. त्यांचे 20 लढतीतून सर्वाधिक 43 गुण झाले. आयएसएल (ISL) स्पर्धेत सलग सात सामने जिंकण्याचा विक्रम आता जमशेदपूरच्या नावे नोंदीत झाला. त्यांनी प्रथमच स्पर्धेची उपांत्य फेरीही गाठली आहे.

सलग 15 सामने अपराजित राहिलेल्या एटीके मोहन बागानला अखेर पराभव पत्करावा लागला व त्यामुळे गुणतक्त्यात ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 20 लढतीतील तिसऱ्या पराभवामुळे त्यांचे 37 गुण कायम राहिले. 38 गुणांसह हैदराबाद एफसीला दुसरा, तर 34 गुणांसह केरळा ब्लास्टर्सला चौथा क्रमांक मिळाला. हे चारही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. आयएसएल स्पर्धेत सलग 15 सामने अपराजित राहण्याचा विक्रम संयुक्तपणे एफसी गोवा आणि एटीके मोहन बागानने नोंदविला आहे.

उपांत्य फेरीचे वेळापत्रक

पहिला टप्पा ः 11 मार्च - जमशेदपूर (Jamshedpur) विरुद्ध केरळा ब्लास्टर्स (फातोर्डा), 12 मार्च - हैदराबाद विरुद्ध एटीके मोहन बागान (बांबोळी)

दुसरा टप्पा ः 15 मार्च - केरळा ब्लास्टर्स (Kerala Blasters) विरुद्ध जमशेदपूर (वास्को), 16 मार्च - एटीके मोहन बागान विरुद्ध हैदराबाद (बांबोळी)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT