James Anderson
James Anderson  PTI
क्रीडा

IND vs ENG: फक्त 2 विकेट्स अन् अँडरसन 'हा' पराक्रम करणारा बनेल जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज

Pranali Kodre

James Anderson eyes on big feat in Dharamsala Test against India:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना होणार आहे. या कसोटी सामन्याला 7 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

दरम्यान, या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. जर अँडरसनला धरमशाला कसोटीत खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या सामन्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट्सचा टप्पा पार करेल.

अँडरसनने जर हा विक्रम केला, तर तो कसोटीत 700 विकेट्स घेणारा जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज ठरणार आहे. तसेच एकूण तिसरा गोलंदाज ठरेल. यापूर्वी कसोटीत ७०० विकेट्सचा टप्पा केवळ मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांनी पूर्ण केला आहे. पण हे दोघेही फिरकी गोलंदाज आहेत.

मुरलीधरनने 800 विकेट्स घेतल्या आहेत, तर वॉर्नने 708 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जेम्स अँडरसन आहे. अँडरसनने आत्तापर्यंत 186 कसोटी सामने खेळताना 698 विकेट्स घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे कसोटीमध्ये 600 पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये केवळ दोनच वेगवान गोलंदाज आहेत. हे दोन वेगवान गोलंदाज म्हणजे अँडरसन आणि त्याचा बराच काळाचा साथीदार स्टुअर्ट ब्रॉड.

तसेच या यादीत पहिल्या पाचमध्ये भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे देखील आहे. कुंबळेने कसोटीत 619 विकेट्स घेतल्या आहेत.

सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज (6 मार्च 2024 पर्यंत)

  • 800 विकेट्स - मुथय्या मुरलीधरन (133 सामने)

  • 708 विकेट्स - शेन वॉर्न (145 सामने)

  • 698 विकेट्स - जेम्स अँडरसन (186 सामने)

  • 619 विकेट्स - अनिल कुंबळे (132 सामने)

  • 604 विकेट्स - स्टुअर्ट ब्रॉड (167 सामने)

अँडरसनची 22 वर्षांची कारकिर्द

अँडरसनने इंग्लंडकडून 2002 मध्ये वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 2003 मध्ये कसोटी पदार्पण केले. विशेष म्हणजे 2003 पासून प्रत्येक वर्षी अँडरसनने कसोटीत किमान एकतरी विकेट घेतली आहे. त्यामुळे गेली सलग 21 वर्षे कसोटीत विकेट्स घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आत्तापर्यंत 399 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 985 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे पुढेही काही काळ खेळत राहिला, तर त्याला 1000 विकेट्स पूर्ण करण्याचीही संधी असणार आहे.

यापूर्वीही असा विक्रम केवळ मुरलीधरन आणि वॉर्ननेच केला आहे. मुरलीधरनने 1347 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत, तर वॉर्नने 1001 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT