Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

विराट कोहलीला सल्ला देत शाहिद आफ्रिदीने, 'हीट मॅन' चं केलं कौतुक

T20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) विराट कोहलीने (Virat Kohli) क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे.

दैनिक गोमन्तक

T20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) विराट कोहलीने (Virat Kohli) क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला आतापर्यंत एकही आयसीसी जेतेपद मिळवून देता आलेले नाही. यावेळी टी20 विश्वचषक जिंकून हा दुष्काळ संपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण तसे झाले नाही. या संघाला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. या विश्वचषकामध्ये संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. विराट कोहलीची बॅट फारसा जलवा दाखवू शकलेली नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीने खेळाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाची भूमिका सोडली पाहिजे, असे आफ्रिदीने म्हटले आहे.

दरम्यान, 'समा टीव्ही' वाहिनीवर बोलताना आफ्रिदी म्हणाला की, रोहित शर्माला भारतीय टी20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा बीसीसीआयचा (BCCI) निर्णय चांगला आहे. भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेच्या शेवटी कोहलीने T20 कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला. "मला वाटते की, तो भारतीय क्रिकेटसाठी त्याने उत्तम कामगिरी केली आहे, परंतु जर त्याने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला तर ते चांगले होईल.

रोहित मानसिकरित्या मजबूत

आफ्रिदी आयपीएल-2008 मध्ये डेक्कन चार्जेसमध्ये (Deccan Charges) रोहित शर्मासोबत खेळला आहे. यावेळी तो म्हणाला, रोहित मानसिकरित्या सक्षम आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) उत्तम कामगिरी केली आहे. तो पुढे असेही म्हणाला की, “मी रोहितसोबत एक वर्ष खेळलो आहे. जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तो उत्तम कामगिरी करत संघाला जिंकण्याचा मार्ग मोकळा करुन देतो. तो एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, त्याचे शॉट सिलेक्शनही उत्कृष्ट आहे.

कोहलीकडून ही अपेक्षा होती

कोहलीच्या टी-20 कर्णधारपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयावर आफ्रिदी म्हणाला, मला याचीच अपेक्षा होती. कोहलीने कर्णधारपद सोडून तिन्ही फॉरमॅटमधील फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. आफ्रिदी पुढे म्हणाला, “मला वाटते की, विराटने कर्णधारपद सोडले पाहिजे आणि त्याने उर्वरित क्रिकेटचा आनंद घेतला पाहिजे. मला अजूनही वाटते की, तो उत्तम कामगिरी करु शकतो. तो एक अव्वल दर्जाचा फलंदाज असून त्याने मुक्तपणे क्रिकेटचा आनंद घेऊ शकेल.

अलीकडेच विराटने आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपलेल्या रवी शास्त्री यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोहली एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडू शकतो आणि केवळ कसोटी संघाचे नेतृत्व करण्यावर लक्ष केंद्रित करु शकतो. जो त्याचा आवडता फॉरमॅट असल्याचे, संकेत दिले होते. 2019 च्या अखेरीस कोहलीने एकही कसोटी शतक झळकावलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT