मानोलो मार्केझ. Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: मोहन बागानवरील विजय समाधान देणारा; एफसी गोवा प्रशिक्षक मार्केझ यांचे मत

यंदा आयएसएल स्पर्धेत तब्बल ५४५ मिनिटानंतर एफसी गोवाने गोल स्वीकारला

किशोर पेटकर

Indian Supre League Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील बलाढ्य संघांपैकी एक मोहन बागान सुपर जायंट्सविरुद्धची विजयी कामगिरी समाधान देणारी असल्याचे मत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सामन्यानंतर व्यक्त केले.

कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर शनिवारी रात्री एफसी गोवाने मोहन बागानला ४-१ असे हरवून २३ गुणांसह अग्रस्थान कायम राखले. त्यानंतर मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘मोहन बागान सुपर जायंट्ससारख्या बलवान संघाविरुद्ध तुम्ही जिंकता, तेव्हा निश्चितच आनंद होतो.

मला वाटतं, की आम्ही विजयासाठी लायक होतो. सामन्याच्या पूर्वार्धात आम्ही खूपच चांगला खेळ केला. मात्र सामन्यात काही वेळा आमच्या संघाने नियंत्रण गमावले, त्याबद्दल मी किंचित चिंतित आहे.

प्रतिस्पर्ध्यांच्या दिमी पेत्रातोस याने केलेला गोल छान होता, पण माझ्या संघाच्या समन्वयाच्या अभावामुळे पूर्वार्धाच्या इंज्युरी टाईममध्ये गोल झाला. हे असे पहिल्यांदा घडलेले नाही.’’ यंदा आयएसएल स्पर्धेत तब्बल ५४५ मिनिटानंतर एफसी गोवाने गोल स्वीकारला.

सलग नऊ सामने अपराजित असलेल्या एफसी गोवाने शनिवारी रात्री सातव्या विजयाची नोंद केली. मोहन बागानविरुद्धच्या विजयात नोआ सदोई याने दोन, तर व्हिक्टर रॉड्रिग्ज व कार्लोस मार्टिनेझ यांनी प्रत्येकी एक गोल केला.

‘‘एकंदरीत विचार करता, संघाच्या कामगिरीवर मी समाधानी आहे. मोसमाच्या सुरवातीपासून आतापर्यंत आम्ही प्रगती साधत असल्याचे दिसून येते. आम्ही आणखी मोठा पल्ला गाठू शकतो याची मला खात्री आहे,’’ असे ५५ वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षक मार्टिनेझ म्हणाले.

मोहन बागानच्या खेळण्याच्या शैलीचा पूर्ण अभ्यास करूनच एफसी गोवा संघ मैदानात उतरल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रतिस्पर्ध्यांवर राखले वर्चस्व

मोहन बागानविरुद्धच्या लढतीत एफसी गोवाने प्रतिस्पर्ध्यांवर पूर्ण वर्चस्व राखले, सामन्याच्या पूर्वार्धात ३-१ अशी आघाडी घेताना अप्रतिम खेळ केला. त्याविषयी मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘माझ्या संघाने पूर्वार्धात खूपच चिकित्सक खेळ केला.

कदाचित अशाप्रकारचा खेळ आम्ही अगोदरच्या लढतीत करू शकलो नव्हतो. त्यामुळे आम्ही गोल करण्याच्या जास्त संधी उपलब्ध असताना १-० फरकाने जिंकू शकलो.’’

मोसमातील आतापर्यंत जिंकलेल्या सातपैकी तीन लढतीत एफसी गोवाने १-० अशा निसटत्या फरकाने विजय नोंदविले आहेत. त्यांचा पुढील सामना २९ डिसेंबर रोजी गुवाहाटी येथे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT