MS Dhoni and Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Ishant Sharma on MS Dhoni: 'जर माहित होतं...', जेव्हा धोनी विराटवर चिडलेला, इशांतने ऐकवला किस्सा

धोनी संघातील खेळाडूंवर कसा चिडतो, याबद्दल इशांत शर्माने खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Ishant Sharma Reveals MS Dhoni Scolded Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नेहमीच त्याच्या शांत स्वभावासाठी कौतुक होत असते. त्याला त्याच्या शांत स्वभावामुळे कॅप्टनकूल हे टोपननावही मिळाले आहे. पण असे असले तरी धोनीचा भारतीय संघातील संघसहकारी इशांत शर्माने तो अनेकदा त्याच्या संघातील खेळाडूंवर चिडत असल्याचाही खुलासा केला.

विराट कोहलीलाही एकदा धोनीचा ओरडा बसला असल्याचेही इशांतने सांगितले आहे. इशांतने अनेकवर्षे धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले आहे.

इशांतने बिअरबायसेप्स युट्युब चॅनेलवरील एका मुलाखतीत सांगितले की 'जेव्हा धोनी शांत असतो आणि कुठेतरी शांतपणे बसलेला असतो, तेव्हा तो त्याच्या झोनमध्ये असतो. काहीतरी गंभीर विचार त्याच्या मनात सुरू असतो आणि जेव्हा त्यावेळई त्याला कोणी काही विचारले, तर तो चिडतो.'

याशिवाय धोनी त्याच्यावरही एक-दोनदा चिडल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, 'जेव्हा मी टाकलेला चेंडू त्याच्यापर्यंत पोहचला नव्हता, तेव्हा तो चिडला होता आणि म्हणाला होता 'हातावर मार'.'

'त्यानंतर 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रवी बोपारा रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवेळी मागे गेला होता. मला वाटते की तो वरून शॉट खेळेल, मी मीड-ऑनला उभा राहिलेलो होतो. त्यामुळे मी आधीच मागे गेलो होते. पण बोपाराने मीड-विकेटला शॉट खेळला आणि जोपर्यंत मी तिथे पोहोतलो, तोपर्यंत चेंडू जमिनीवर पडला होता आणि बोपाराने 2 धावा घेतल्या होत्या.'

'त्यावेळी धोनी काही बोलला नाही. ते वडीलांसारखे होते की ते त्यांच्या मुलांवर चिडले की त्यांच्या डोळ्यातील भाव पाहून सर्व समजून जाते. पण नंतर तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, 'जर तिथे क्षेत्ररक्षण करता येत नाही, तर तिथे उभा राहू नकोस.' त्यानंतर मी शांततेत शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षणासाठी गेलो.'

याशिवाय इशांतने सांगितले की धोनी अनेकदा ज्यूनियर खेळाडूंबरोबर चेष्टा-मस्करीही करतो. त्याने सांगितले की 'तो शांत नाहीये, तो त्याच्या खेळाडूंना ओरतही असतो, अगदी मलाही... मजा करतोय. तो मला नेहमीच लहान भावाप्रमाणे गोष्टी समजावत असतो. खरंतर मी त्याला विचारलेही होते की तो माझी चेष्टा इतकी का करतो, त्यावर त्याने सांगितले होते की 'मी ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांनाच मी चिडवतो.'

याबरोबरच इशांतने धोनी एकदा विराटवरही चिडला असल्याचे सांगितले. ही घटना 2013 मध्ये झाली होती, त्यावेळी शिखर धवनचा पहिला कसोटी सामना होता आणि त्याच्या अंगठ्याला लागल्याने त्याने दुसऱ्या डावात फलंदाजी केली नव्हती.

इशांतने सांगितले 'ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही कसोटी सामना खेळत होतो. दुसऱ्या डावात सामना थोडा फसला होता, कारण शिखर त्याच्या अंगठ्याला लागल्याने फलंदाजी करू शकला नव्हता. पण आम्ही जिंकलो होतो.'

'त्या सामन्यात चिकू (विराट कोहली) बाद झाला होता. पण सामना जिंकल्यानंतर माही भाई चिकूकडे गेला आणि त्याला म्हणाला, 'जर तुला माहित आहे की आपल्याकडे एक फलंदाज कमी आहे, तर तो शॉट खेळण्याची गरज काय होती?' तो चिडला नव्हता, पण त्याच्या त्या बोलण्याने विराटला त्याची चूक जाणवली होती.'

हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मोहालीला 14 ते 18 मार्चदरम्यान झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT