Ishan Kishan | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: नटखट इशानने केली विराटची नक्कल, मग किंग कोहलीनंही दिली भन्नाट रिऍक्शन, पाहा Video

Virat Kohli - Ishan Kishan: आशिया कप जिंकल्यानंतर इशानने विराटसमोरच केली त्याची नक्कल, व्हिडिओ होतोय व्हायरल

Pranali Kodre

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final, Ishan Kishan - Virat Kohli:

रविवारी भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला 10 विकेट्सने पराभूत केले. कोलंबोमधील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवत आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.

पण या विजयानंतर इशान किशन आणि विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसले. त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

आशिया चषक जिंकल्यानंतर प्रेझेंटेशनवेळी भारतीय खेळाडू मैदानावर मस्ती करत होते. याचवेळी इशान किशन आणि विराट कोहली एकमेकांशी काहीतरी मजेशीर संभाषण करताना दिसले. त्यानंतर इशानने विराटची चालताना नक्कलही करून दाखवली. त्यावर विराटनेही खिल्ली उडवत चालून दाखवले.

त्यांची ही मस्करी सुरू असताना तिथेच मोहम्मद सिराज, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी असे काही खेळाडूही उभे होते आणि तेही या क्षणांची मजा घेत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर हा सामना साधारण सव्वा दोन तासातच संपला. श्रीलंकेने या सामन्यात नाणेफेक जिंकली होती आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, मोहम्मद सिराजचा भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे श्रीलंकेला 15.2 षटकात 50 धावांवरच सर्व विकेट्स गमावाव्या लागल्या. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस (17) आणि दुशन हेमंता (13) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.

तसेच भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. यातील 4 विकेट्स त्याने चौथ्याच षटकात घेतल्या होत्या. 

त्यानंतर त्यानंतर भारताने 51 धावांचे आव्हान अवघ्या 6.1 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. भारताकडून इशान किशन 23 धावांवर आणि शुभमन गिल 27 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे भारताने तब्बल 263 चेंडू बाकी ठेवून विजय मिळवला. भारताचा हा चेंडूंच्या तुलनेत मिळवलेला वनडेतील सर्वात मोठा विजय ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT