Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: 'तो पुरेसा तंदुरुस्त आहे का?', रोहित शर्माच्या नेतृत्वावर कपिल देव यांचा सवाल

कपिल देव यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma: साल 2022 मध्ये बीसीसीआयने गेल्यावर्षी रोहित शर्माला सर्व प्रकारच्या क्रिकेट संघाचे पूर्णवेळ कर्णधार केले. तो पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून भारताने 68 सामनेही खेळले आहेत, मात्र त्यातील केवळ 39 सामन्यांत रोहित सहभागी झाला आहे. तो 29 सामने मुकण्यामागे दुखापती किंवा विश्रांती ही मुख्य कारणे राहिली.

पण, आता याच कारणामुळे भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कपिल देव यांनी रोहित खेळाडू म्हणून उत्तम असल्याचे म्हटले आहे, पण त्यांनी त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

('Is Rohit Sharma fit enough?' asked Kapil Dev)

'रोहित शर्मामध्ये काही कमी नाही, त्याच्याकडे सर्वकाही आहे. पण मला वैयक्तिकरित्या वाटते की त्याच्या तंदुरुस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह आहे. तो पुरेसा तंदुरुस्त आहे का? कारण कर्णधाराने स्वत: संघातील अन्य खेळाडूंना तंदुरुस्त राहाण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे. संघसहकाऱ्यांना त्यांच्या कर्णधाराबद्दल अभिमान वाटला पाहिजे,' असे मत कपिल देव यांनी एबीपी न्यूजशी बोलताना मांडले.

कपिल देव पुढे म्हणाले, 'मी हे खात्रीने सांगू शकतो की रोहितच्या तंदुरुस्तीवर मोठी शंका आहे. तो कर्णधार झाल्यापासून त्याने खूप धावा केल्या नसल्याने त्याच्यावर टीकाही होत आहे. मी काहीप्रमाणात याच्याशी सहमत असलो, तरी मला वाटत नाही की त्याच्या खेळातील कौशल्यामध्ये काही समस्या आहेत. तो खूप यशस्वी क्रिकेटपटू आहे, जर तो तंदुरुस्त झााल, तर संपूर्ण संघ त्याच्याभोवती फिरेल.'

रोहित मागील महिन्यापासून हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघातून बाहेर होता. त्याला बांगलादेश दौऱ्यातील वनडे मालिकेदरम्यान त्याला क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. आता तो 10 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT