भारतात खेळाला केवळ खेळ म्हणून न पाहता त्याहून अधिक महत्त्व आहे. त्यामूळे कोणता खेळाडू काय म्हणतो याकडे क्रीडा रसिकांचे तर लक्ष असतेच याबरोबर सामान्यांना ही याबाबत उत्सूकता असते. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. (Irfan Pathan praised Arshdeep Singh )
माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये अर्शदीप सिंगला संधी मिळायला हवी. असं म्हटलं आहे. तसेच याबाबत बोलताना म्हणाला कि, पंजाब किंग्जकडून पदार्पण केल्यापासून अर्शदीपने गोलंदाजीत बरीच सुधारणा केली आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीने सर्वांना चकित केले आहे.
आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये त्याने 14 सामन्यांत केवळ 10 विकेट घेतल्या होत्या. तसेच या हंगामात उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकसह संघात स्थान देण्यात आले. इरफान पठाणनेही या मोसमात अर्शदीपला जास्त विकेट्स मिळाल्या नसल्याची कबुली दिली. पण अर्शदीपमध्ये दबावात भरभराट होण्याची क्षमता आहे. असं ही तो यावेळी म्हणाला.
"विकेट्सच्या बाबतीत जर तुम्ही आयपीएलच्या आकड्यावर नजर टाकली तर सामने जास्त आणि विकेट कमी. त्यानंतरही निवडकर्त्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्याला संघात घेतले. त्याच्या मागचे कारण म्हणजे तो सर्वोत्तम फलंदाज आहे. जेव्हा तो डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करतो तेव्हा तो धोनी आणि हार्दिक सारख्या फलंदाजांना शांत ठेवतो. तो यॉर्करने क्रिजवर फलंदाजांना त्रास देतो.
तो पुढे म्हणाला, ‘‘तुम्ही काही विचार करून डावखुरा गोलंदाज तुमच्या संघात ठेवला आहे. कारण डावीकडे नेहमीच उजवे असते. त्यामुळे त्याला सर्व सामने खेळायला द्यावा असा तो गोलंदाज आहे. जो नेहमी आपल्या संघासाठी काहीतरी करेल, जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती असेल तेव्हा तो यॉर्कर टाकेल आणि विकेट घेण्याचा प्रयत्न करेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.