Irfan Pathan Got Trolled While Trolling Pakistan After Asia Cup Match
Irfan Pathan Got Trolled While Trolling Pakistan After Asia Cup Match Dainik Gomantak
क्रीडा

"हेलो बेटा, इनका राष्ट्रवाद का सब्सक्रिप्शन 7 दिन तक बढ़ा दो," पाकिस्तानला ट्रोल करायच्या प्रयत्नात इरफान फसला

Ashutosh Masgaunde

Irfan Pathan Got Trolled While Trolling Pakistan After Asia Cup Match:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप स्पर्धेतील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. प्रथम खेळताना भारतीय संघाचा डाव 266 धावांवर आटोपला. मात्र भारतीय डाव संपल्यानंतर आलेल्या पावसाने सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही.

यानंतर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण याने पाकिस्तानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण या नादात इरफान स्व:ताच ट्रोल झाला.

हा सामना अनिरर्णित राहिला त्यामुळे पाकिस्तान पराभूत होण्यापासून वाचला. अशा आशयाचे ट्विट इरफानने केले होते. त्यामध्ये तो म्हणाला,"बहोत सारे पडोसियोंकी टीव्ही आज बच गये."

यावर एका यूजरने इरफानच्या ट्विटला प्रतिसाद देत त्यालाच ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. हा यूजर गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो वापरत म्हणाला, "हॅलो बेटा जय, इरफान का राष्ट्रवाद का सबस्क्रिप्शन 7 दिवस तक बढ़ा दो."

या सामन्यात भारताकडून हार्दिक पांड्याने 90 चेंडूत 87 धावा केल्या, तर इशान किशनने 81 चेंडूत 82 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे भारताने सुरुवातीला बसलेल्या धक्कातून सावरत सन्मानजनक धावसंख्या उभी केली होती.

पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताची अवस्थान 4 बाद 66 अशी केली होती. यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशनने डाव सांभाळला. दोघांनी 138 धावांची भागीदारी केली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 4 तर नसीम शाह आणि हरिस रौफने 3-3 विकेट घेतल्या.

हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे पाकिस्तानला 1 गुण मिळाला. त्यामुळे ते स्पर्धेच्या सुपर फोर फेरीसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेच्या पुढील टप्प्यात प्रवेश करण्यासाठी रोहित शर्मा आणि कंपनीला सोमवारी होणारा भारत-नेपाळ सामना जिंकणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT