Team India Dainik Gomantak
क्रीडा

India vs Ireland: पहिल्याच सामन्यात पावसाचा अडथळा? कुठे पाहाणार T20I मालिका, जाणून घ्या सर्व काही...

IRE vs IND, 1st T20I: बुमराहच्या कर्णधार म्हणून पहिल्याच टी20 मॅचमध्ये पावसाचा अडथळा? काय आहेत हवामान अंदाज, वाचा

Pranali Kodre

Ireland vs India, 1st T20I, Weather and Live Streaming Details:

आयर्लंड विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून 3 सामन्यांची टी20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मलाहाईड, डब्लिन येथे होणार आहे.

या मालिकेत जसप्रीत बुमराह नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये बुमराह पहिल्यांदाच कर्णधार म्हणून दिसणार आहे.

दरम्यान, भारताने आत्तापर्यंत आयर्लंडविरुद्ध 5 टी20 सामने खेळले असून सर्व 5 सामन्यात विजय मिळवला आहे.

तसेच  भारताचा हा एकूण आयर्लंडचा चौथा दौरा आहे. यापूर्वी भारताने 2007 मध्ये एकमेव वनडे सामना आयर्लंडला खेळला होता. त्यानंतर 2018 आणि 2022 साली भारताने 2 सामन्यांच्या टी20 मालिका आयर्लंडला खेळल्या.

आता एक वर्षाने पुन्हा भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध टी20 सामने खेळणार आहे. पण, पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. पहिला टी20 सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.

याचदरम्यान हवामान अंदाजानुसार डब्लिनमध्ये दुपारी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सामना रद्द देखील होऊ शकतो किंवा सामन्यातील षटकांची संख्या कमी केली जाऊ शकते.

कुठे पाहाणार सामना

भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिन्ही टी20 सामने मलाहाईडमधील द व्हिलेज मैदानावर खेळवले जाणार आहेत. हे तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहेत.

तसेच या सामन्यांचे भारतात स्पोर्ट्स 18 या चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, तर जिओ सिनेमा ऍपवर सामना ऑनलाईन पाहाता येणार आहे.

असे आहेत दोन्ही संघ

  • भारत - जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

  • आयर्लंड - पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्पर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वूरकोम, बेन व्हाइट, क्रेग यंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT