IRE vs IND, 1st T20I: रिंकू सिंगचे होणार पदार्पण? पहिल्या मॅचसाठी अशी असेल भारताची संभाव्य 'प्लेइंग-11'

India vs Ireland: भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Ireland vs India, 1st T20I probable Playing XI:

भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी मलाहाईड, डब्लिन येथे होणार आहे.

या मालिकेसाठी हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल अशा अनेक सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे काही खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय पदार्पण या मालिकेतून होऊ शकते.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी दिली जाणार हा मोठा प्रश्न आहे.

Team India
Jasprit Bumrah: पुनरागमनासाठी कॅप्टन बुमराह आतुर! नेटमध्ये करतोय बाउंसर, यॉर्करचा मारा, पाहा Video

अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा हे ज्या फॉर्ममध्ये आहेत, ते पाहाता त्यांना फलंदाजी फळीत संधी मिळू शकते. तसेच उपकर्णधार ऋतुराज गायकवाडची साथही त्यांना मिळू शकते. याशिवाय शिवम दुबे, रिंकू सिंग या खेळाडूंनाही प्लेइंग इलेव्हनध्ये संधी मिळू शकते.

असे झाल्यास रिंकू सिंगचे भारतीय संघाकडून पदार्पणही होईल. याशिवाय भारताकडे यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा असे पर्याय आहेत. पण संजू सॅमसनचा अनुभव पाहाता, त्याला पहिली पसंती मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय वॉशिंग्टन सुंदर फिरकी गोलंदाजीबरोबरच खालच्या फळीत फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. तसेच फिरकी गोलंदाजीसाठी त्याला रवी बिश्नोईची साथ मिळू शकते. वेगवान गोलंदाजीमध्ये कर्णधार जसप्रीत बुमराह याच्यासह मुकेश कुमार, आर्शदीप सिंग यांचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये असू शकतो.

Team India
IND vs IRE: बच के रहना! टीम इंडियाचे 'हे' 2 गोलंदाज आयर्लंडसाठी ठरणार कर्दनकाळ

दरम्यान, बुमराह या मालिकेतून 10 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. तो पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या 10 महिन्यात भारताकडून खेळला नव्हता. पण आता थेट कर्णधार म्हणूनच त्याचे पुनरागमन होणार आहे.

भारताचा आयर्लंड दौरा

दरम्यान भारताचा हा एकूण आयर्लंडचा चौथा दौरा असणार आहे. यापूर्वी भारताने 2007 मध्ये एकमेव वनडे सामना आयर्लंडला खेळला होता. त्यानंतर 2018 आणि 2022 साली भारताने 2 सामन्यांच्या टी20 मालिका आयर्लंडला खेळल्या.

  • पहिल्या टी20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवी बिश्नोई, आर्शदीप सिंग, मुकेश कुमार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com