Iran Football Team to be Jailed
Iran Football Team to be Jailed Dainik Gomantak
क्रीडा

Iran Football Team to be Jailed?: इराणच्या फुटबॉल संघाला होणार तुरूंगवास?

Akshay Nirmale

Iran Football Team to be Jailed?: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत (FIFA World Cup 2022) सोमवारी इराण-इंग्लंड सामन्यातील एक घटना चर्चेची ठरली आहे. हा सामना इंग्लंडने 6-2 गोलफरकाने जिंकला. या सामन्याच्या सुरवातीला इराण संघाने त्यांच्या देशात सुरू असलेल्या महिलांच्या हिजाब विरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशाचे राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. तथापि, या कारणारमुळे आता इराणच्या फुटबॉल संघावर देशात परतल्यानंतर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.

(Anti Hijab Protest In Iran)

इराणमध्ये हिजाबविरोधी मोहिमेत पोलिस कस्टडीत 22 वर्षीय महसा अमिनी हीचा मृत्यू झाल्यानंतरपासून तिथे आंदोलन सुरू आहे. महसा हिने चुकीच्या पद्धतीने हिजाब परिधान केले होते. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती.

इराणमधील महिला हिजाब पेटवून देत आणि केस कापून निषेध करत या आंदोलनात उतरल्या आहेत. इराणमध्ये सर्वत्र हे आंदोलन पसरले आहे. इराणला इतर देशांमधून ही या आंदोलनासाठी पाठिंबा मिळत आहे. अनेक महिला केस कापून, हिजाब जाळून या महिलांना पाठिंबा देत आहेत. त्यातच इराणच्या फुटबॉल संघाने फुटबॉल वर्ल्डकपसारख्या जागतिक प्लॅटफॉर्मवर देशातील महिलांच्या आंदोलनाचे समर्थन करताना राष्ट्रगीत न गाण्याचा साहसी निर्णय घेतला. विशेष म्हणजे या वेळी स्टेडियमध्ये उपस्थित असलेल्या इराणी प्रेक्षकांनीही राष्ट्रगीताला विरोध केला.

अशी कारवाई होण्याची शक्यता...

या विरोधामुळे आता इराणच्या फुटबॉल टीमवर शिक्षेची टांगती तलवार टांगलेली आहे. सरकारविरोधी कृतीमुळे या खेळाडुंवर कडक कारवाई होऊ शकते. या फुटबॉलपटुंविरोधात अटक वॉरंट जारी केल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सरकारला आव्हान दिल्याने या फुटबॉलपटुंना तुरूंगात टाकले जाऊ शकते. किंवा नजरकैद केले जाऊ शकते. फुटबॉल बोर्ड बरखास्तही केला जाऊ शकतो. त्यामुळे हा संघ भविष्यात कुठल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपवेळीही असाच प्रकार पाहायवयास मिळाला होता. स्पर्धेपुर्वी दोन महिने आधी तालिबानने काबुलवर ताबा मिळवला. तालिबानने शरिया कायदा आणि तालिबानी ध्वज लागू केला. पण अफगाणिस्तानची क्रिकेट टीम स्कॉटलंडविरूद्धच्या सामन्यात तालिबानऐवजी अफगाणिस्तानचाच ध्वज घेऊन मैदानात उतरली. तसेच त्यांनी राष्ट्रगीतही गायले नाही. यावेळी सर्वांचे डोळे भरून आले होते.

दरम्यान, ग्रुप स्टेजमध्ये इराणचा पुढचा सामना 25 नोव्हेंबर रोजी वेल्स संघाशी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

SCROLL FOR NEXT