MS Dhoni Twitter
क्रीडा

RCB vs CSK: धोनीने सांगितले पराभवाचे कारण, गोलंदाजीने खेळात आणली रंगत पण फलंदाजीने डूबवले

IPLमध्ये बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभवाचा सामना करावा लागला.

दैनिक गोमन्तक

आयपीएलमध्ये IPL चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्याच बुधवारी रात्री सामना रंगला. या सामन्यात RCB ने CSK चा 13 धावांनी पराभव केला. पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी संघाच्या फलंदाजीबाबत निराश दिसला. या पराभवाचे कारण त्याने खराब फलंदाजी केल्याचे सांगितले. आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली पण आम्ही फलंदाजीत बुडालो, असे स्पष्टपणे धोनीने कबूल केले. (IPL 2022 Updates)

आम्ही त्यांना (RCB) 170 च्या आसपास रोखून खूप चांगली खेळी खेळली पण फलंदाजीमुळे आम्हाला पराभूत व्हावे लागले. जेव्हा तुम्ही आपल्या ध्येयाचा पाठलाग करता तेव्हा तुमचे शॉट्स खेळण्याऐवजी तुम्हाला परिस्थिती काय मागणी करते हे पाहणे महत्वाचे असते.आमची फलंदाजी थोडी सुधारली असती तर आम्ही शेवटच्या षटकात इतक्या धावा करू शकलो नसतो. आम्ही फलंदाजीतही चांगली सुरुवात केली. आमच्याही विकेट होत्या. खेळपट्टीही फलंदाजीसाठी चांगली होती. मात्र समस्या अशी होती की थोड्या वेळाने आम्ही लगातार विकेट गमावत राहिलो. जेव्हा तुम्ही मधल्या फळीत फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला कसे खेळावे हे समजले पाहिजे, असे धोनी म्हणाला.

चेन्नईचा सातवा पराभव

या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना कोहली (30), डू प्लेसिस (38) आणि महिपाल (42) यांच्या छोट्या खेळीमुळे 173 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईनेही पहिल्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली. मात्र यानंतर चेन्नईने ठराविक अंतराने विकेट गमावल्या आणि संघाला 13 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव चेन्नईचा या मोसमातील सातवा पराभव आहे. त्यामुळे चेन्नई आता गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT