IPL Player Sandeep Lamichchane Dainik Gomantak
क्रीडा

IPL Player Arrested: क्रिकेटपटू संदीप लामिछाने याला अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या आरोपावरून अटक

काठमांडू विमानतळावरून घेतले ताब्यात; संदीपने फेसबूकवरून मांडली निर्दोष असल्याची भूमिका

गोमन्तक डिजिटल टीम

IPL Player Arrested: नेपाळच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळलेला क्रिकेटपटू संदीप लामिछाने (Sandeep Lamichchane) याला अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. काठमांडू विमानतळावर पोलिसांनी त्याला अटक केली.

संदीपने यापुर्वीच शरण येत असल्याचे त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून सांगितले होते. त्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले त्याच्या चाहत्यांना सांगितले होते की, या प्रकरणात त्याला गोवले जात आहे, तो पुर्णतः निर्दोष आहे. पोलिसांना तपासात संपुर्ण सहकार्य करणार आहे. मी निर्दोष आहे आणि ते सिद्ध करण्यासाठई मी कायदेशीर लढाई लढेन.

या संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीत वकीलाला सोबत ठेवण्याची परावानगीही संदीपने मागितली होती. संदीप लामिछाने याला रविवारी न्यायालयात हजर केले जाऊ शकते. नेपाळ पोलिसांनी याबाबत तयारी केली आहे.

काठमांडू जिल्हा न्यायालयाने 23 ऑगस्ट रोजी संदीप लामिछाने याच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. पण क्रिकेट स्पर्धेच्या दौऱ्यामुळे तो त्यापुर्वीच देशाबाहेर गेला होता.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी दहाच्या सुमारास काठमांडू विमानतळावर पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतले. संदीप लामिछाने हा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळला होता. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 9 सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT