IPL trophy 2025 Dainik Gomantak
क्रीडा

IPL Final 2025: किंग विराट समोर मराठमोळा'अय्यर' पडणार भारी? 17 वर्षांचा दुष्काळ आतातरी संपणार का?

RCB vs PBKS Final Match: इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्याचा थरार आता नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनुभवायला मिळणार आहे

Akshata Chhatre

अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्याचा थरार आता नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनुभवायला मिळणार आहे. ३ जूनच्या दिवशी होणाऱ्या या अंतिम लढतीत पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हे दोन बलाढ्य संघ विजेतेपदासाठी आमनेसामने उभे ठाकले आहेत. क्रिकेटप्रेमींना एका अत्यंत रोमांचक आणि अविस्मरणीय सामन्याची अपेक्षा आहे.

रॉयल चॅलेंजर्सचा धडाकेबाज प्रवेश, पंजाबचा 'कमबॅक'

रॉयल चॅलेंजर्सने पहिल्या एलिमिनेटरमध्ये पंजाब किंग्जवर दमदार विजय मिळवून थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. मात्र, पंजाब किंग्जने हार मानली नाही.

क्वालिफायर-२ मध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सला धक्कादायक पराभव करत अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स सोबतची आपली जागा पक्की केली. एका आठवड्यात मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा पराभूत करून पंजाबने इरादे स्पष्ट केले आहेत.

"इतिहास घडवण्याची संधी"

पंजाब किंग्ज दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचले होते, पण कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे, २०११ मध्ये नॉकआउट फॉरमॅट सुरू झाल्यापासून तोच त्यांचा एकमेव प्लेऑफ सहभाग होता. यंदा मात्र, कर्णधार श्रेयस अय्यरने इतिहास रचला आहे.

दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स आपली चौथी आयपीएल फायनल खेळत आहे. यापूर्वी २००९, २०११ आणि २०१६ मध्ये ते उपविजेते ठरले होते, जिथे त्यांना अनुक्रमे डेक्कन चार्जर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता. गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्सचे फॅन्स विजयाची ट्रॉफी पाहण्यासाठी उत्सुक आहेत. यंदा आयपीएलचं हे १८वं वर्ष असल्याने किमान आता तरी विराट कोहलीला जिंकण्याची संधी मिळेल अशी अशा चाहत्यांच्या मनात आहे. रजत पाटीदरच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करतोय.

लीग टप्प्यातील चुरस आणि आता अंतिम लढत

लीग टप्प्यात पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स यांनी प्रत्येकी नऊ विजय, चार पराभव आणि एक अनिर्णित सामना नोंदवत गुणतालिकेत पहिले आणि दुसरे स्थान पटकावले होते. त्यांचे नेट रन रेटही जवळपास सारखेच होते. लीग सामन्यांमध्ये, पंजाबने बंगळूरुमध्ये रॉयल चॅलेंजर्सला पराभूत केले होते, तर रॉयल चॅलेंजर्सने मोल्लनपूरमध्ये त्याचा बदला घेतला होता.

२९ मे रोजी मोल्लनपूर येथे क्वालिफायर-१ मध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले. तिथे रॉयल चॅलेंजर्सने पंजाबला केवळ १०१ धावांत गुंडाळले आणि दहा षटके बाकी असतानाच लक्ष्य गाठून अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्यानंतर पंजाब अहमदाबादला मुंबई इंडियन्सचा सामना करण्यासाठी क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला आणि त्यांना दुसऱ्यांदा पराभूत करून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता या दोन संघांमधील अंतिम लढत क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT