IPL trophy if match abandoned Dainik Gomantak
क्रीडा

IPL Final 2025: विराटच्या पदरात पुन्हा निराशा? पाऊस पडल्यास 'या' संघाला मिळणार ट्रॉफी; BCCI चा नियम काय सांगतो, वाचा

Rain rule IPL final: सायंकाळी ७:३० वाजता सुरू होणाऱ्या या महाअंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्ज हे विजेतेपदासाठी आमनेसामने उभे ठाकले आहेत

Akshata Chhatre

अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा अंतिम सामना मंगळवार ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. सायंकाळी ७:३० वाजता सुरू होणाऱ्या या महाअंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्ज हे विजेतेपदासाठी आमनेसामने उभे ठाकले आहेत.

रॉयल चेलेंजर्सने क्वालिफायर-१ मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती, तर पंजाब किंग्जने क्वालिफायर-२ मध्ये मुंबई इंडियन्सला हरवून दमदार पुनरागमन करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता या दोन संघांमधील अंतिम लढत क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

पावसाचे सावट आणि विजेतेपदाचे नियम

यंदाच्या हंगामात अनेक सामन्यांवर पावसाचे सावट होते आणि काही सामने रद्दही झाले. त्यामुळे, आजच्या अंतिम सामन्यात पाऊस पडला किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामना झाला नाही, तर विजेता संघ कसा ठरवला जाईल, हा चाहत्यांसाठी मोठा प्रश्न आहे.

पावसाचा व्यत्यय आल्यास नियम काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये जर का पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे किमान पाच षटकांचा खेळ शक्य झाला नाही, तर सामना ४ जून रोजी राखीव दिवशी अंतिम सामना खेळवला जाईल.

शिवाय सामन्याचा निकाल एकाच दिवसात लागावा यासाठी बीसीसीआयने १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवला आहे. तरीही निकाल लागला नाही, तर राखीव दिवस वापरला जाईल.

राखीव दिवशी, सामना जिथे थांबला होता, तिथूनच पुन्हा सुरू होईल. जर राखीव दिवसातही पावसामुळे व्यत्यय आला आणि किमान पाच षटकांचाही खेळ शक्य झाला नाही, तर आयपीएलचा विजेता 'सुपर ओव्हर'द्वारे ठरवला जाईल. मात्र, जर 'सुपर ओव्हर' घेणेही शक्य झाले नाही, तर पॉइंट्स टेबलमधील स्थानानुसार विजेता संघ निश्चित केला जाईल.

चालू हंगामात पंजाब किंग्जने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने दुसरे स्थान पटकावले आहे. याचा अर्थ असा की, जर अंतिम सामना रद्द झाला, तर पंजाब किंग्जला विजेता घोषित केले जाईल. या नियमांमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली असून, आजचा सामना पावसामुळे बाधित होऊ नये अशी प्रार्थना सर्वचजण करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

SCROLL FOR NEXT