Virat Kohli IPL 2025 Dainik Gomantak
क्रीडा

IPL Final 2025: विजेतेपद पटकावलं तर 'किंग कोहली' करणार निवृत्तीची घोषणा? IPL अध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले...

Virat Kohli IPL Retirement: जर आरसीबीने ट्रॉफी जिंकली तर विराट आयपीएलला कायमचा रामराम ठोकणार का? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना सतावतोय

Akshata Chhatre

अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा अंतिम सामना मंगळवार (दि. ३) या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. देशात क्रिकेटचं वेड तर आहेच पण या सोबतच विराट यंदाच्या वर्षी ट्रॉफी उचलणार का? असा प्रश्न निर्माण झालाय आणि याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जर आरसीबीने ट्रॉफी जिंकली तर विराट आयपीएलला कायमचा रामराम ठोकणार का? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना सतावतोय. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आले आहे.

'तू टेनिसमधील फेडरर-जोकोविचसारखा!' अरुण धुमाळ

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी क्रिकेट आयकॉन विराट कोहलीला आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने आयपीएल २०२५ चा अंतिम सामना जिंकला तरीही कोहलीने निवृत्ती घेऊ नये, असे धुमाळ यांनी म्हटले आहे. धुमाळ यांनी कोहलीचे कौतुक करताना त्याची तुलना टेनिसमधील दिग्गज रॉजर फेडरर किंवा नोव्हाक जोकोविच यांच्याशी केली.

धुमाळ म्हणाले, "मला वाटतं की त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेऊ नये, तो या खेळाचा सर्वात मोठा खेळाडू आहे. क्रिकेटसाठी त्याची बांधिलकी टेनिसमधील रॉजर फेडरर किंवा नोव्हाक जोकोविचसारखी आहे, त्यामुळे मला तो खेळत राहावा अशी माझी इच्छा आहे."

सोशल मीडियावर व्हायरल 'खोटी' बातमी

१ एप्रिल २०२५ रोजी फेसबुकवर एका युजरने विराट कोहलीचा फोटो शेअर करत लिहिले होते, "विराट कोहली आयपीएलनंतर निवृत्त होणार आहे."

या फोटोवर 'विराट कोहलीने या हंगामात आयपीएलमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे' असे कॅप्शनही लिहिलेले होते. अशाच दाव्यासह इतरही अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

मात्र विराट कोहलीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर अशी कुठलीही माहिती दिलेली नाही. त्याच्या निवृत्तीची पुष्टी करणारी कोणतीही पोस्ट किंवा विधान आढळले नाही, त्यामुळे विराट आयपीएल सोडणार का? या प्रश्नाचं उत्तर फक्त विराट कोहलीचं देऊ शकतो असं म्हणावं लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT