Virat Kohli: किंग कोहलीचा ऐतिहासिक पराक्रम; टी-20 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू!

IPL 2025 Virat Kohli Record: विराट कोहली आयपीएल २०२५ मध्ये चांगली कामगिरी करत आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये नेण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

विराट कोहलीची गणना टी-२० क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये केली जाते. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे आणि २००८ पासून तो त्याच संघ आरसीबीकडून खेळत आहे. तो चालू हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि भरपूर धावा करत आहे. आता सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने २५ चेंडूत ४३ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि १ षटकार होता.

एकाच संघासाठी ८०० चौकार

सामन्यात ७ चौकार मारून त्याने आरसीबीसाठी टी-२० क्रिकेटमध्ये ८०० चौकार पूर्ण केले आहेत. तो टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एकाच संघासाठी ८०० चौकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

जेम्स विन्सने हॅम्पशायरकडून टी-२० क्रिकेटमध्ये ६९४ चौकार मारले आहेत.तर नॉटिंगहॅम संघासाठी अ‍ॅलेक्स हेल्सने ५६३ चौकार मारले आहेत. भारताच्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये ५५० चौकार मारले आहेत.

Virat Kohli
Goa Rain: गोवा, कोकणपट्टा ‘अलर्ट मोड’वर! 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार; पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी

आयपीएलमध्ये ८००० पेक्षा जास्त धावा

विराट कोहली २००८ पासून आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत आहे. आतापर्यंत त्याने २६४ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण ८५५२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ८ शतके आणि ६२ अर्धशतके झळकावली आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाजही आहे.

Virat Kohli
Goa Politics: मला मुख्‍यमंत्री का केले? सोनिया गांधींना विचारा! दिगंबर कामतांचे चोडणकरांना प्रत्त्युत्तर

आरसीबी संघाने चालू हंगामात चांगली कामगिरी केली आहे आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये विराट कोहलीने मोठे योगदान दिले आहे. त्याने चालू हंगामात आतापर्यंत ५४८ धावा केल्या आहेत. धावांचा पाठलाग करताना, त्याने एक वेगळाच दर्जा दाखवला आहे.

त्याने आयपीएल २०२५ मध्ये धावांचा पाठलाग करताना ५९, ६२, ७३, ५१ आणि ४३ धावा केल्या आहेत. त्याला चेस मास्टर म्हणून ओळखले जाते. जर तो मैदानावर असेल तोपर्यंत चाहते विजयाची आशा बाळगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com