MS Dhoni's Daughter Viral Photo Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni's Daughter Viral Photo: 'देव बाप्पा प्लिज...', IPL फायनलवेळी माहीच्या लेकीचा तो फोटो व्हायरल...पाहून तुम्हीही म्हणाला...

आयपीएल दरम्यान धोनीच्या लेकीचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Puja Bonkile

MS Dhoni Daughters Viral Photo: आयपीएल 2023 च्या फायनल सामन्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोण जिंकेल काही सांगता येत नव्हतं. मोहित शर्माने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती त्यावरून तरी सीएसके जिंकेल असे काही वाटत नव्हते.

पण रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत षटकार आणि चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फायनलला शेवटच्या चेंडूवेळी सर्व चाहत्यांनी जीव मुठीत धरुन ठेवला होता. त्याच वेळी धोनीची लेक झिवा देखील होत जोडून देवाकडे प्रार्थना करत होती. तिचा हा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या शानदार विजयानंतर झिवा धोनीही ट्रॉफीसोबत दिसले. अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो एका बाजूला आयपीएल ट्रॉफी हातात धरून असल्याचे दिसून येत आहे.

जडेजाने मारले विजयी शॉट

रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी 10 धावांची गरज असताना रविंद्र जडेजाना एक षटकार आणि चौकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला.

अंतिम सामन्यात गुजरातने वृद्धिमान साहा (54) आणि साई सुदर्शन (96) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या होत्या. पण नंतर चेन्नईच्या फलंदाजीवेळी सुरुवातीलाच पाऊस आल्याने डकवर्थ लुईसनुसार चेन्नईसमोर 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

चेन्नईकडून रविंद्र जडेजा 6 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला. तसेच शिवम दुबे 21 चेंडूत 32 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 47 धावा केल्या. तसेच ऋतुराज गायकवाड (26), अजिंक्य रहाणे (27) आणि अंबाती रायुडू (19) यांनीही छोटेखानी महत्त्वाच्या खेळी केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 3 आणि नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, या विजयासह सीएसके संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. मुंबई इंडिअन्सने पाचवेळा विजेतेपद जिंकलं होतं, या विक्रमाशी सीएसकेने आता बरोबरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT