IPL Auction 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामाचा लिलाव शुक्रवारी कोची येथे पार पडला. या लिलावात अनेक विक्रमी बोली लागलेल्या पाहायला मिळाल्या. सुरुवातीलाच अष्टपैलू खेळाडूंच्या बोलीने सर्वांते लक्ष वेधले. दरम्यान, या लिलावासंदर्भात अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.
सॅम करन, कॅमरॉन ग्रीन आणि बेन स्टोक्स हे तिन्ही परदेशी अष्टपैलू क्रिकेटपटू आयपीएल लिलावातील सर्वात महागडे क्रिकेटपटू ठरले. सॅम करनसाठी पंजाब किंग्सने आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वाधिक 18.50 कोटींची बोली लागली, तर ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटींची बोली लावून संघात घेतले.
तसेच बेन स्टोक्ससाठी चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी खर्च केले. याशिवाय हॅरी ब्रुकसाठी देखील 13.25 कोटी रुपये सनरायझर्स हैदराबादने खर्च केले, तर निकोलस पूरनला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटी रुपये दिले.
भारतीय खेळाडूंमध्ये मयंक अगरवालला सर्वाधिक रक्कम मिळाली. त्याच्यावर 8.25 कोटी रुपयांची बोली सनरायझर्स हैदराबादने लावली. त्यामुळे या लिलावाबद्दल मोठी चर्चा सोशल मीडियावरही झाली. तसेच सनरायझर्स हैदराबादच्या संघमालकांची मुलगी काव्या मारनही सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये होतील.
दरम्यान, या लिलावासाठी 405 खेळाडूंचा समावेश होता. त्यातील केवळ 87 खेळाडूंना बोली लागू शकत होती. कारण सर्व 10 संघात मिळून 87 खेळाडूंच्या जागा रिकाम्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.