Yuvraj Singh Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: "त्या तिघांना चपलेने मारा...", प्लेऑफमधून बाहेर पडताच युवराज सिंगचा चढला पारा; सोशल मीडियावर दिली जाहीर धमकी

Yuvraj Singh Slipper Threat Punjab Kings: युवीने खासगीत नव्हे तर थेट सोशल मीडियावर जाहीरपणे या खेळाडूंना चपलेने मारण्याबाबत कमेंट केली, ज्याची सध्या क्रीडा जगतात प्रचंड चर्चा रंगली.

Manish Jadhav

Yuvraj Singh Viral Comment IPL 2026: आयपीएल 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफच्या चार संघांची नावे निश्चित झाली आहेत. मात्र, एकीकडे प्लेऑफची रणधुमाळी सुरु असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह एका वेगळ्याच मूडमध्ये दिसला. युवराज आयपीएलमधील तीन खेळाडूंवर चांगलाच संतापला असून, त्याने त्यांना चपलेने मारण्याची भाषा केली.

विशेष म्हणजे, युवीने खासगीत नव्हे तर थेट सोशल मीडियावर जाहीरपणे या खेळाडूंना चपलेने मारण्याबाबत कमेंट केली, ज्याची सध्या क्रीडा जगतात प्रचंड चर्चा रंगली. युवराजने ज्या तीन खेळाडूंवर आपला दरारा दाखवला, त्यांचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. यातील एक खेळाडू युवराजचा थेट शिष्य आहे, तर उर्वरित दोघांनी त्याच्याकडून थेट प्रशिक्षण घेतले नसले तरी त्यांचे युवराजशी 'पंजाब' कनेक्शन नक्कीच आहे.

युवराजने जाहीरपणे कानउघाडणी केलेल्या खेळाडूंमध्ये प्रियांश आर्या, अर्शदीप सिंह आणि हरप्रीत ब्रार यांचा समावेश आहे. हे तिन्ही खेळाडू आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्स संघाचा भाग होते. पंजाब किंग्सच्या संघाला या हंगामातही अत्यंत निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला असून, ते ग्रुप स्टेजमधूनच स्पर्धेबाहेर पडले. आता प्रश्न असा पडतो की, युवराज सिंह या खेळाडूंवर अचानक का भडकला? तर याचे कारण हरप्रीत ब्रारने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो ठरला.

हरप्रीतने प्रियांश आर्या आणि अर्शदीप सिंह यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने प्रियांशला 'स्लॉगर' (फटकेबाजी करणारा) आणि अर्शदीपला 'ब्लॉगर' असे म्हटले होते. या फोटोवर कमेंट करताना युवराज सिंहने लिहिले की, "आता तुम्हा सर्वांना चपलेने मारण्याची वेळ आली आहे." युवीची ही कमेंट सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाली.

जर या तिन्ही खेळाडूंच्या आयपीएल 2026 मधील कामगिरीवर नजर टाकली, तर पंजाब किंग्सला (Punjab Kings) प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात ते अपयशी ठरले. प्रियांश आर्याची कामगिरी तुलनेने बरी राहिली; त्याने 13 सामन्यांत 211 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 364 धावा केल्या. मात्र, अर्शदीप सिंह या हंगामात प्रचंड महागडा ठरला. त्याने 14 सामन्यांत तब्बल 541 धावा देऊन केवळ 14 विकेट्स घेतल्या, तर त्याचा इकॉनॉमी रेट 10.20 चा राहिला.

दुसरीकडे, फिरकीपटू हरप्रीत ब्रारला या हंगामात केवळ 2 सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या. पंजाबचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर खेळाडूंच्या या सोशल मीडियावरील पोस्ट पाहूनच युवीने मोठ्या भावाच्या किंवा गुरुच्या नात्याने त्यांना सुनावल्याचे स्पष्ट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Sextortion Case: धमकी, मारहाण अन् सेक्सटॉर्शन; म्हापसा येथील व्यावसायिकाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या डेहराडूनमधून गजाआड

Guru Chandal Yog: गुरु-चांडाल योगाचा अशुभ प्रभाव, तीन राशींची धाकधूक वाढली; पैशांची चणचण आणि आजारपण वाढणार

Goa Crime: धारदार शस्त्रानं थेट गळ्यावर वार... मोबोर समुद्रकिनाऱ्यावर छत्तीसगडच्या तरुणाची हत्या, तिघांवर गुन्हा दाखल

Petrol Diesel Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! 10 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल- डिझेलच्या किमतीत वाढ, नवीन दर तपासा

Cricketer Death: 4 ओव्हर्स टाकल्या अन्... LIVE मॅच दरम्यान खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, क्रिकेट विश्वावर शोककळा!

SCROLL FOR NEXT