rcb Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026 Points Table: "आरसीबीचा 'विराट' विजय!" गुजरातला नमवून गुणतालिकेत पटकावलं दुसरं स्थान; प्ले-ऑफच्या दिशेनं आगेकूच

IPL Points Table Update: इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 34व्या साखळी सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला.

Manish Jadhav

IPL Points Table Update: इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 34व्या साखळी सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला. 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने 18.5 षटकांतच विजय साकारत यंदाच्या हंगामातील आपला पाचवा विजय नोंदवला. या विजयामुळे आरसीबीने गुणतालिकेत आपली स्थिती अधिक मजबूत केली असून ते आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत 205 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत हे कठीण लक्ष्य सहज पार केले. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने 7 पैकी 5 सामने जिंकले असून, 10 गुणांसह आणि 1.101 च्या दमदार नेट रनरेटसह त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. गुणतालिकेत सध्या पंजाब किंग्सची टीम 11 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. पंजाबने 6 पैकी 5 सामने जिंकले असून त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यांचा नेट रनरेट 1.420 असा सर्वाधिक आहे.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सची टीम 7 सामन्यात 5 विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरली. त्यांचा नेट रनरेट 0.790 इतका आहे. सनरायझर्स हैदराबादने 7 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह चौथे स्थान पटकावले. चेन्नई सुपर किंग्स 5व्या, तर दिल्ली कॅपिटल्स 6व्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्सला या पराभवामुळे मोठा फटका बसला असून ते 6 गुणांसह 7व्या स्थानावर आहेत. त्यांचा नेट रनरेट उणे 0.790 इतका खाली घसरला.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांनी 7 पैकी प्रत्येकी 2 सामने जिंकले असून ते अनुक्रमे 8व्या आणि 9व्या क्रमांकावर आहेत. सर्वात धक्कादायक कामगिरी कोलकाता नाईट रायडर्सची राहिली आहे. 7 सामन्यांनंतर केकेआरला केवळ एकच विजय मिळवता आला असून ते गुणतालिकेत शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहेत. यंदाच्या हंगामात आरसीबी आणि पंजाब किंग्समधील अव्वल स्थानासाठीची चुरस आता अधिक रंजक झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT