Punjab Kings Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

IPL 2026 Points Table Standings: इंडियन प्रीमियर लीग 2026 चा हंगाम आता अशा वळणावर पोहोचला, जिथे प्रत्येक विजय आणि पराभव प्लेऑफची समीकरणे बदलत आहे.

Manish Jadhav

IPL 2026 Points Table Standings: इंडियन प्रीमियर लीग 2026 चा हंगाम आता अशा वळणावर पोहोचला, जिथे प्रत्येक विजय आणि पराभव प्लेऑफची समीकरणे बदलत आहे. शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस रंगलेल्या 'डबल हेडर' मुकाबल्यांनंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या हंगामात आतापर्यंत 29 सामने पूर्ण झाले असून सर्व 10 संघांमध्ये पंजाब किंग्स हा एकमेव असा संघ ठरला, ज्याला अद्याप कोणीही पराभूत करु शकलेले नाही.

रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करुन आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थान अधिक मजबूत केले असून त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश आता जवळपास निश्चित मानला जात आहे.

पंजाब किंग्सच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत विजय मिळवला, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. 11 गुणांसह पंजाब सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. पंजाबच्या खालोखाल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि राजस्थान रॉयल्स यांचे प्रत्येकी 8 गुण आहेत. मात्र, चांगल्या नेट रनरेटमुळे आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे, तर राजस्थान रॉयल्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. या तिन्ही संघांनी स्पर्धेत आपली पकड मजबूत ठेवली असून ते प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे, गुणतालिकेत चौथ्या ते सहाव्या क्रमांकासाठी सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात निकराची लढत सुरु आहे. या तिन्ही संघांचे प्रत्येकी 6 गुण आहेत. मात्र, स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी तळाच्या संघांची चिंता वाढत चालली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांसारख्या मोठ्या संघांची अवस्था सध्या बिकट आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी सहा सामने खेळून केवळ दोनच विजय मिळवले असून 4 गुणांसह ते गुणतालिकेत खालच्या स्थानावर आहेत. विशेषतः चेन्नईच्या खराब फॉर्ममुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स (MI) या माजी विजेत्या संघांसाठी हा हंगाम आतापर्यंत अत्यंत निराशाजनक ठरला आहे. 7 सामन्यांनंतर केकेआरकडे केवळ 3 गुण आहेत, तर 5 सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सच्या खात्यातही जेमतेम गुणांची भर पडली आहे. मुंबई आणि कोलकाता या दोन्ही संघांना आता प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आगामी सर्व सामन्यांमध्ये चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे. एकूणच, आयपीएलचा हा हंगाम आता अत्यंत गंभीर टप्प्यात प्रवेश करत असून येणाऱ्या काळात अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी मैदानावर अधिक थरार पाहायला मिळणार हे निश्चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT